पुणे, ११/०२/२०२५: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी ची लेखी परीक्षेला आजपासून सुरवात झाली आहे. पुण्यातील भावे हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा तणावमुक्त द्यावी यासाठी परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून,साखर वाटून स्वागत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा उद्यापासून ११ फेब्रुवारी ते मंगळवार,१८ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली व ३७ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी म्हणाले की आजपासून आमची परीक्षा सुरू होत आहे.परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे.पण कुठेतरी दडपण आहे.पाहिलं पेपर असल्याने मनात भीती आहे पण ते ही आत्ता शिक्षकाकडून औक्षण झाल्यावर ते दूर झालं आहे.आणि निश्चितच चांगल पेपर जाईल अस यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितल.
जीबीएस संदर्भात देखील घेण्यात आली खबरदारी…
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून जीबीएस या आजाराचे रुग्ण हे वाढत असून बारावीच्या परीक्षेसाठी देखील याबाबत खबरदारी घेण्यात आली आहे.जे विद्यार्थी परीक्षेसाठी येणार आहे त्यांनी स्वतःहा पिण्याची बॉटल घरून आणावी तसेच इतरांचे पाणी कोणीही पिऊ नये अशी खबरदारी घेण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कैमेराव्दारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल.तसेच परीक्षा सुरु होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल.आणि परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल.आणि जिल्हयातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात येणार आहे.आणि जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित घटकांची तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल.तसेच Maharashtra Prevention Of Malpractices Act 1982 या कायद्याची अंमलबजावणी करावी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणा-यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल.

More Stories
पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा; बीसीसीआय मानकांनुसार देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट सेटअप
Pune: कात्रज बायपास मार्गावर आता ४० किमी/तास कमाल वेग बंधनकारक; पोलीस उप-आयुक्तांची आदेशिका लागू
Pune: शिवणे–खराडी रस्त्याच्या रखडलेल्या कामावर श्वेतपत्रिका जाहीर करा : खर्डेकर यांची मागणी