पुणे, 20 फेब्रुवारी 2025: फर्ग्युसन कॉलेज यांच्या वतीने व शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या सहकार्यांने आयोजित एमएसएलटीए फर्ग्युसन कॉलेज पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशभरांतून 150 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा 22 ते 28फेब्रुवारी2025 या कालावधीत फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमीत पार पडणार आहे.
स्पर्धेचे संचालक संग्राम चाफेकर यांनी सांगितले कि, स्पर्धेत महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या ठिकाणांहून 150 हुन अधिक खेळाडू झुंजणार आहेत. ही स्पर्धा 16वर्षाखालील मुले व मुलींच्या एकेरी गटात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री वैशाली शेकटकर यांची निवड करण्यात
आली असल्याचे त्यांनी सांगितले.
खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे: मुले: 1. मनन अग्रवाल(महा),
2.आराध्य म्हसदे(महा), 3.मनन राय(मह), 4.वरद उंद्रे(महा), 5.वीरेन
सूर्यवंशी(महा), 6.मलय मिंजरोला(गुजरात), 7. अगस्त्य चौधरी(गुजरात),
8.नीव गोगिया;
मुली: 1.साजी जैन (मध्यप्रदेश), 2.स्वानिका रॉय (महा), 3.ऋषिता पाटील
(महा), 4.वृंदिका राजपूत (महा), 5.प्रार्थना खेडकर (महा), 6.नलयाझिनी के
(तामिळनाडू), 7.मित्रविंदा सतीश (तामिळनाडू), 8.तेजस्वी मानेनी(तेलंगणा)
More Stories
पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना मैत्रीपूर्ण बॅडमिंटन लीग स्पर्धेत कटक्कर ईगल्स संघाला विजेतेपद
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला