पुणे, 23 फेब्रुवारी 2025 : डीईएस’ श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय, पुणे आणि अखिल भारतीय अधिवक्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नॅशनल लॉ कॉलेज, नेपाळ यांच्या सहकार्याने आयोजित ” “ट्रान्सजेंडर्स राईटस: ग्लोबल पेरस्पेकटिव्हस व एमर्जिंग ट्रेंड्स” ” या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा यशस्वी समारोप झाला.
कुंदनमल फिरोदिया सभागृहात पार पडलेल्या या चर्चासत्रात नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. उमेश चंद्र मोरे, युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस नांतेरच्या प्राध्यापक स्टेफनी डिजू आणि मैत्री संघटना, कोल्हापूरच्या अध्यक्ष मयुरी आळवेकर तसेच डॉ सांवि जेठवानी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ट्रान्सजेंडर समावेशन आणि समानता, कायदेशीर अधिकार आणि आंतरविषयकता, तसेच ट्रान्ससोशल समावेशनातील मानवाधिकार अडथळे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा केली.
प्रमुख वक्त्यांनी ट्रान्सजेंडर समुदायाच्या मूलभूत हक्कांवर प्रकाश टाकला आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक कायदेशीर व सामाजिक बदलांवर भर दिला. उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि अभ्यासकांनी या विषयावर विविध प्रश्न विचारत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे संयोजन, अॅड सचिन राणे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष, व महाविद्यालय विकास अध्यक्ष अॅड. अशोक पलांडे यांनी केले, तर श्री नवलमल फिरोदिया विधिमाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनीता आधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. डॉ. ऐश्वर्या यादव, प्रज्ञा यादव आणि पूजा देव यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.
या चर्चासत्रामुळे ट्रान्सजेंडर हक्कांविषयी जागरूकता वाढवण्यास मदत झाली असून, कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

More Stories
पुणे ग्रँड टूरनिमित्त १९ जानेवारीला पुण्यातील प्रमुख रस्त्यावरील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला