October 14, 2025

पीवायसी मोतीलाल ओसवाल स्नूकर स्पर्धा 8 मार्चपासून रंगणार

पुणे, 24 फेब्रुवारी 2025: पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित व मोतीलाल ओसवाल प्रायोजित पीवायसी मोतीलाल ओसवाल स्नूकर 2025 स्पर्धेत देशभरातली अनेक अव्वल मानांकित दिग्गज खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा 8 ते 13 मार्च 2025या कालावधीत पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखाना, रॉयल कॅनॉट बोट क्लब, अमनोरा स्पोर्टस क्लब रंगणार आहे.

या स्पर्धेत केवळ पुण्यातीलच नव्हे तर देशभरातील अव्वल मानांकित खेळाडूंचा सहभाग असून अंदाजे 3लाख रुपये रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच, ही बाद पद्धतीने पार पडणार आहे.

स्पर्धा संचालक अरुण बर्वे यांनी सांगितले की, पीवायसी मोतीलाल ओसवाल स्नूकर स्पर्धेच्या दर्जाची एक मोठी स्पर्धा आयोजित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या स्पर्धेमध्ये उच्च दर्जाच्या कौशल्याबरोबरच खिलाडूवृत्ती, स्पर्धात्मकता आणि करमणूक यांचा आगळा संगम पाहावयास मिळणार आहे. इतेकच नव्हे तर या स्पर्धेमुळे भारतातील हा खेळ एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचणार आहे.

या स्पर्धेमध्ये अनेक जगज्जेत्या व विश्वविजेत्या दिग्गज खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना बरोबरच रॉयल कॅनॉट बोट क्लब, अमनोरा स्पोर्टस क्लब या ठिकाणी देखील रंगणार आहे.