October 14, 2025

अखिल महाराष्ट्र आंतरक्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन चार्जर्स संघाला विजेतेपद

पुणे, 24 फेब्रुवारी 2025: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित नवव्या अखिल महाराष्ट्र आंतरक्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन चार्जर्स संघाने(150 गेम्स )अव्वल क्रमांक पटकावत विजतेपद संपादन केले. तर, पीवायसी हिंदू जिमखाना अ संघाने(148 गेम्स) उपविजेतेपद आणि खार जिमखाना संघाने(138 गेम्स) गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्ट या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन चार्जर्स, पीवायसी हिंदू जिमखाना अ आणि खार जिमखाना या तीनही संघांनी प्रत्येकी चार सामने जिंकल्यामुळे बरोबरी झाली. त्यामुळे डेक्कन चार्जर्स संघाने साखळी फेरीत चार सामन्यांमध्ये सर्वाधिक 150 गेम्स जिंकल्यामुळे पहिला क्रमांक पटकावला. तर, पीवायसी हिंदू जिमखाना अ संघाने(148 गेम्स) दुसरा आणि खार जिमखाना संघाने(138 गेम्स) गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला.

डेक्कन चार्जर्स संघाने सीसीआय संघाचा 32-01 असा एकतर्फी पराभव केला. विजयी संघाकडून जयदीप दाते, मुकुंद जोशी, अजित सैल, मदन गोखले, नितीन किर्तने, मंदार वाकणकर, हृषिकेश पाटसकर, संदीप किर्तने यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. तर, प्रशांत गोसावी, अनुप मिंडा, हिमांशू गोसावी, केतन धुमाळ, केदार शहा, परज नाटेकर, अभिषेक ताम्हाणे, रोहन गिडे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी अ संघाने संभाजीनगर डिस्ट्रिक्ट अ संघाचा 32-13 असा पराभव केला. अन्य लढतीत खार जिमखाना संघाने सीसीआय संघाचा 32-16 असा पराभव केला. खार जिमखानाकडून नीरज देसाई, निशित पांडे, वर्धन
शहा, गौतम सी, अमित तांबे, अभिजीत मुजुमदार, रोहन गज्जर, भाविक खांडरे यांनी अफलातून कमगिरी बजावली.

स्पर्धेतील विजेत्या डेक्कन चार्जर्स संघाला करंडक व 1,25,000 रुपये, तर उपविजेत्या पीवायसी हिंदू जिमखाना अ संघाला 75,000 रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाच्या खार जिमखाना संघाला 25,000 रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे आजीव अध्यक्ष व स्पर्धा संचालक शरद कन्नमवार, एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य, पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव मिहीर केळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

निकाल: साखळी फेरी:

पीवायसी अ वि.वि. संभाजीनगर डिस्ट्रिक्ट अ 32-13(110 अधिक गट: प्रशांत
गोसावी/अनुप मिंडा वि.वि.अक्रम खान/कपिल जमाल 8-3; 100 अधिक गट: हिमांशू
गोसावी/केतन धुमाळ वि.वि.विजय मेहेर/गोपाल पांडे 8-7(4); 90 अधिक गट:
केदार शहा/परज नाटेकर वि.वि.संजय गंगापूरकर/संतोष नागपुरे 8-1; खुला
दुहेरी: अभिषेक ताम्हाणे/रोहन गिडे वि.वि.शरद के/अमित देशमुख 8-2);

डेक्कन चार्जर्स वि.वि.सीसीआय 32-01(110 अधिक गट: जयदीप दाते/मुकुंद जोशी
वि.वि.विक्रम संपत/निखिल संपत 8-0; 100 अधिक गट: अजित सेल/मदन गोखले
वि.वि.लव कोठारी/प्रसाद प्रधान 8-0; 90 अधिक गट: नितीन किर्तने/मंदार
वाकणकर वि.वि.धर्मेंद्र शर्मा/युसूफ 8-1; खुला दुहेरी: हृषिकेश
पाटसकर/संदीप किर्तने वि.वि.इंतिखाब अली/गोविंद मोहन 8-0);

खार जिमखाना वि.वि.सीसीआय 32-16(110 अधिक गट: नीरज देसाई/निशित पांडे
वि.वि.निखिल संपत/लव कोठारी 8-5; 100 अधिक गट: वर्धन शहा/गौतम सी
वि.वि.विक्रम संपत/प्रसाद प्रधान 8-6; 90 अधिक गट: अमित तांबे/अभिजीत
मुजुमदार वि.वि.इमरान युसूफ/धर्मेंद्र शर्मा 8-4; खुला दुहेरी: रोहन
गज्जर/भाविक खांडरे वि.वि.इंतिखाब अली/गोविंद मोहन 8-1);

पीवायसी अ वि.वि.डेक्कन चार्जर्स 27-26(110 अधिक गट: प्रशांत गोसावी/अनुप
मिंडा पराभुत वि.संदीप कीर्तने/अजय 3-8; 100 अधिक गट: केतन धुमाळ/जयंत
कढे वि.वि.नितीन किर्तने/अजित सैल 8-6; 90 अधिक गट: ऋतु कुलकर्णी/केदार
शहा वि.वि. मुकुंद जोशी/मंदार वाकणकर 8-6; खुला दुहेरी: अभिषेक
ताम्हाणे/रोहन गिडे वि.वि.रक्षय ठक्कर/हृषिकेश पाटसकर 8-6);