January 16, 2026

खराडी, चंदननगर व वडगाव शेरीमध्ये शुक्रवारी पाणी पुरवठा बंद

पुणे, २५ फेब्रुवारी २०२५ ः चंदननगर येथील पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीचे तातडीचे काम करण्यात येणार असल्याने शुक्रवारी (ता.२८) खराडी, चंदननगर व वडगाव शेरी तसेच लष्कर जलकेंद्रावर अवलंबुन असलेल्या परिसरात पाणी पुरवठा बंद असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. १मार्च) रोजी पाणीपुरवठा उशिरा व कमी दाबाने होईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडुन देण्यात आली आहे.

चंदननगर येथील टाकीच्या मुख्य जलवाहिनीचे तातडीचे व अत्यावश्‍यक स्वरुपाचे दुरुस्तीचे काम शुक्रवारी पाणी पुरवठा विभागाकडुन केले जाणार आहे. त्यामुळे खराडी, चंदननगर, वडगाव शेरीमधील आनंद पार्क, सुनीता नगर, गणेश नगर, स्वामी समर्थ, नामदेव नगर, मते नगर, पुण्य नगरी, महावीर नगर, मुन्नवार सोसायटी, माळवाडी परिसर तसेच लष्कर जलकेंद्रावर अवलंबुन असलेल्या परिसराचा पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद असणार आहे. शनिवारी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.