पुणे, २७/०२/२०२५: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे हा फरार असून आरोपीवर १ लाख रुपयांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केल आहे.याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आला आहे.
स्वारगेट चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं.यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आंदोलकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामाची मागणी देखील करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की स्वारगेट बस स्थानक येथे पुणे पोलीस सुरक्षा पुरविण्यात अपयशी झाल्याने ही घटना घडली आहे.स्वारगेट सारख्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होत आहे हे खूप निंदनीय आहे. या प्रकरणातील आरोपीची सर्व माहिती असताना देखील आरोपीला अटक होत नाही म्हणजे हा पोलिसांचं अपयश आहे.आमचं आरोप आहे की हा आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याने त्याला पकडण्यात येत नाहीये हे सरकारच पोलिसांचं अपयश असल्याचं यावेळी जगताप म्हणाले.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही