October 15, 2025

लिंबू खातोय ‘भाव’: लिंबाच्या वाढत्या किमती व मागणी कायम, पण खिशाला चट!

राजेश घोडके
पुणे, १७ मार्च २०२५: उन्हाळा सुरू झाला की लिंबाला मागणी वाढते. लिंबू सरबत, लिंबू पाणी, कोशिंबीर आणि जेवणातील विविध पदार्थांमध्ये लिंबाचा वापर वाढतो. मात्र, यावर्षी लिंबाच्या किमतींनी उच्चांक गाठला असून सध्या बाजारात एका लिंबूचा दर हा १० ते १५ रुपये इतका आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच चाट बसत आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा ताप चांगलाच जाणवू लागला आहे. अशात शीतपेयांना पसंती मिळत असून नागरिकांची पावले आपोआप अशा थंड पेयांच्या दुकानांकडे ओळत आहेत. त्यात घरात झटपट तयार होणारे शीतपेय म्हणून लिंबू पाणीचा पर्याय निवडला जातो. त्यामुळे सहाजिकच आहे, की या लिंबूची मागणी वाढत असून त्याचे दर सुद्धा वाढले आहेत. आकडेवारीनुसार, यावर्षी लिंबाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीनुसार लिंबाची आवक कमी झाल्यामुळे किमतीत वाढ झाली आहे. तर किरकोळ बाजारात लिंबाची किंमत १० ते १२ रुपये प्रति लिंबू झाली आहे. सामान्य माणसाला लिंबू जेवणात आवश्यक आहे, त्यामुळे वाढत्या किमती असूनही मागणी कायम आहे.

याबाबत फळ-भाजी विक्रेता ओमकार इरले यांनी सांगीतले की, “उन्हाळा सुरू होतो तशी ग्राहकांची पसंती रसरशीत आंबट फळांसाठी वाढते. साध्या बाजारात लिंबू हे चढत्या किमतीत आहे. आम्ही मंडईतून लिंबू खरेदी करतो व किलोला १७० ते १८० रुपये भाव आहे. नग प्रमाणे ६,७,८ रुपये दर्जानुसार ठोक भाव आहे. त्यामुळे आम्ही ग्राहकांना १० ते २० तिने नग देतो, आमचा नफा कमी होतो, पण ग्राहकांशी जुळत घेऊन त्या जोडीला इतर फळे, पालेभाज्या विकल्या जातात म्हणून कमी नफा असेल तरी ग्राहक नाराज नाही होणार यांची काळजी घ्यावी लागते.”

मागील एक दोन वर्षात जास्त भावा वाढ झाली नाही. दरम्यान २०२३-२४ मध्ये फुल ग्लास १५ तर हाप ग्लास निरा १० रुपये इतका दर लावत होतो. आता त्यात फक्त पाच रूपयांची वाढ झाली आहे. असे निरा विक्रेते शंकर भंडारी यांनी सांगितले.