पुणे, १८ मार्च २०२५: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराचे नुकतेच तिथीनुसार असणाऱ्या शिवजयंतीला, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन व लोकार्पण झाले. विशेष बाब म्हणजे या सोहळ्यासाठी खास दुबईतून आलेल्या ‘त्रिविक्रम ढोल ताशा’ पथकाने शिवप्रेमींची मने आपल्या दिमाखदार वादनाने जिंकून घेतली.
त्रिविक्रम ढोल ताशा पथकातील ३० पेक्षा अधिक वादक या सोहळ्याला वादन करण्यासाठी सज्ज होते. ज्यांनी आपल्या वैविध्यपूर्ण वादनकौशल्याने फक्त शिवप्रेमीच नव्हे तर मुख्यमंत्र्यांना देखील मंत्रमुग्ध केले.
मुख्यमंत्री यांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्रिविक्रम ढोल ताशा पथकाला कौतुकरूपी शाबासकीची थापच दिली आणि खास दुबईहून येऊन वादनसेवा सादर करून या पथकाची शिवरायांप्रति असलेल्या निःस्वार्थ भावनेची प्रशंसा केली. सोबतच मानचिन्ह देऊन त्रिविक्रम ढोल ताशा पथकाचा सन्मान केला. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी, त्रिविक्रमचे संस्थापक अध्यक्ष सागर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, २०१७ पासून आखाती देशातील मानाचे पहिले पथक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. सोबतच त्यांनी त्रिविक्रम पथकाचा आपली कला-संस्कृती जतन करण्याच्या कार्याचा आढावा मांडला आणि हा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वादन करण्याचा प्रसंग असल्याने विशेष आनंद झाल्याचे नमूद केले.
यावेळी शिवक्रांती प्रतिष्ठानचे प्रमुख राजूभाऊ चौधरी यांनी दिलेल्या सन्मानचिन्हाचा स्वीकार करून पाटील यांनी त्यांचे आभार मानले.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी