October 15, 2025

चऱ्होली मधील अनधिकृत प्लॉटिंग विरोधात कारवाई

पुणे, ९ एप्रिल २०२५ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या मंगळवारी (ता. ८) मौजे चऱ्होली, तालुका खेड मधील अनधिकृत प्लॉटिंगच्या विरोधात मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या ठिकाणी झाली कारवाई :
– माऊली कृपा डेव्हलपर्स (गट क्र. ७३) मध्ये प्लॉटिंग व अंतर्गत रस्ता (अंदाजित क्षेत्रफळ – ४४५८९ चौ. फूट २)
– दतकृपा डेव्हलपर्स, गट क्र. ३१५/२ मध्ये प्लॉटिंग, अंतर्गत रस्ता, कंपाऊंड वॉल
– शिवगणेश पार्क, गट क्र. ३२५ मध्ये प्लॉटिंग व अंतर्गत रस्ता (अंदाजित क्षेत्रफळ – ०५०० चौ. फूट)
– गिरीश लाडे, शिवगणेश पार्क, गट क्र. ३२५ मधील ५७ मी. कंपाऊंड वॉल
– विष्णू पार्क, गट क्र. ३०६ मध्ये प्लॉटिंग व अंतर्गत रस्ता
– ग्रीन व्हॅली पार्कमध्ये प्लॉटिंग व अंतर्गत रस्त्यांवर

दरम्यान ही कारवाई पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे तसेच पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील व उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसिलदार सचिन मस्के व रविंद्र रांजणे आणि शाखा अभियंता विष्णू आव्हाड, गणेश जाधव, अभिनव लोंढे, सागर जाधव, प्रणव डेंगळे, शरद खोमणे, शशिभूषण होले, हरीप माने व दिपक माने यांनी पार पाडली.

या कारवाईमुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे हद्दीमध्ये होणाऱ्या अनधिकृत प्लॉटिंगला आळा बसेल.

प्लॉट खरेदीपूर्व सर्व कागदपत्रे तपासा :
बेकायदेशीर अनधिकृत प्लॉटिंग म्हणजे शासनाकडील कोणतीही बिनशेती परवानगी न घेता ले-आऊट करून फक्त तात्पुरते रस्ते दाखवले जातात. त्यामध्ये त्या जागेचा ले आऊट नकाशा मंजूर करून घेतला जात नाही. त्यामुळे अशा प्लॉट्सना बांधकाम परवानगी मिळत नसल्याने प्लॉट खरेदी करण्यापूर्वी आवश्यक ती सर्व कागदपत्रे तपासून नागरिकांनी गुंतवणूक करावी. असे आवाहन सह आयुक्त डॉ. दिमी सुर्यवंशी-पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.