पुणे, दिनांक २१ जानेवारी : पी. एम. शहा फाऊंडेशन व वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामान्य ते असामान्य या प्रकट मुलाखत व संवाद कार्यक्रमात कावेरी व दीपक नागरगोजे या दाम्पत्याची प्रकट मुलाखत होणार आहे. बीड जिल्ह्यातील आर्वी या गावी ‘शांतीवन’ या नावाने प्रसिद्ध असलेली संस्था दीपक नागरगोजे यांनी चालू केली.
या संस्थेमार्फत रस्त्यावर टाकून दिलेली मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, नको असलेली मुले तसेच संकटात सापडलेल्या मुलांना निवारा व शिक्षण देण्यासाठी मदत केली जाते. अशा या अनाथ, वंचित मुलांसाठी हक्काचे घर निर्माण करून देणारे दीपक नागरगोजे व कावेरी दीपक नागरगोजे या दांपत्याचा जीवन प्रवास व कार्य लोकांसमोर यावे म्हणून ‘सामान्य ते असामान्य’ या या विशेष कार्यक्रमात त्यांची प्रकट मुलाखत ठेवण्यात आली आहे.
सदर कार्यक्रम विनामूल्य असून तो शनिवार, दिनांक २५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटल समोर असलेल्या वर्धमान प्रतिष्ठानच्या सभागृहात
संपन्न होईल.

More Stories
पुणे ग्रँड टूरनिमित्त १९ जानेवारीला पुण्यातील प्रमुख रस्त्यावरील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला