पुणे, दि.3 मार्च, 2026 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात आरिन माळी(3250पॉईंट्स, बीएम स्मॅशर्स), तनिश बेलगलकर(3250पॉईंट्स, बीएम स्मॅशर्स), सुधांशु मेडसीकर(3250पॉईंट्स, गरगंटू डिस्ट्रॉयर्स), इशांत रेगे(3250पॉईंट्स, गरगंटू डिस्ट्रॉयर्स), क्षितिज कोतवाल(3250पॉईंट्स, गोल्ड लीफ हंटर्स), रोनित जोशी(3250पॉईंट्स, परुळेकर पॅडलर्स), अनुज मेहता(3150पॉईंट्स, विश्राम वॉरियर्स) हे खेळाडू महागडे ठरले आहेत. ही स्पर्धा 4 ते 8 मार्च 2026 या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना येथील पिकलबॉल कोर्टवर होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, मानद सचिव दिपक गाडगीळ आणि पिकलबॉल विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून पहिल्याच वर्षी सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. स्पर्धेला पुसाळकर ग्रुप यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
स्पर्धेत 204 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धकांची निवड लिलाव पध्दतीने एकूण 10 संघांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पिकलबॉल लीग स्पर्धेचे पहिल्यांदाच आयोजन करताना आम्हाला खूप आनंद झाला आहे. कारण या स्पर्धेद्वारे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकलो असे पीवायसी हिंदू जिमखानाचे सह सचिव सारंग लागू यांनी सांगितले.
स्पर्धेत 10 संघांमध्ये गरगंटू डिस्ट्रॉयर्स(रोहन पुसाळकर), गोल्ड लीफ हंटर्स(अथर्व अय्यर व क्षितिज कोतवाल), फाल्कन्स(चैतन्य राहातेकर), विश्राम वॉरियर्स(इंद्रनील कोतवाल), बीएम स्मॅशर्स(सिद्धार्थ बदामीकर), पिकी ब्लाईंडर्स(निमिष कुलकर्णी व रोहन दामले), परुळेकर पॅडलर्स (अद्वैत परुळेकर), के-प्र पिकलर्स(सचिन सरपोतदार), हुबळीकर हरिकेन्स(प्रतीक हुबळीकर), द बिग डिंक्स(नंदन डोंगरे) यांचा समावेश आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक पारितोषिक देण्यात येणार असल्याचे क्लबच्या पिकलबॉल विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे यांनी सांगितले. नंदन डोंगरे स्पर्धा संचालक म्हणून काम पाहतील.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनसाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, सारंग लागू, सुधांशु मेडसीकर यांचा समावेश आहे.

More Stories
रुग्ण हक्क परिषदेच्या अध्यक्षपदी उमेश चव्हाण यांची फेरनिवड
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल २०२६ स्पर्धेस १ मार्चपासून सुरुवात
पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचे आव्हान संपुष्टात