पुणे, 7 मार्च 2023- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी एचडीएफसी रॅकेट लीग स्पर्धेत 6 संघात 210 खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर दि.8मार्चपासून सुरू होणार आहे.
अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव कुमार ताम्हाणे आणि क्लबचे मानद सचिव सारंग लागू यांनी सांगितले की, पीवायसी एचडीएफसी रॅकेट लीग ही अनोखी व नाविन्यपूर्ण अशी लीग स्पर्धा मिश्र गटांत होणार असून यामध्ये प्रौढ, पुरूष, महिला आणि कुमार यांचा संघात समावेश असणार आहे. स्पर्धेचे हे सलग सहावे वर्ष आहे.
क्लबचे मानद सचिव सारंग लागू पुढे म्हणाले की, क्लबच्या सभासदांकरिता क्रिकेट, बॅडमिंटन, फिटनेस आणि इतर सर्व रॅकेट क्रीडा प्रकारांमध्ये अशा चार वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात लीग स्पर्धा आयोजित करणारा पीवायसी हिंदू जिमखाना हा शहरांतील एकमेव क्लब आहे. तसेच या क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून सदस्यांना मनोरंजनबरोबरच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यास महत्वपूर्ण ठरेल. या प्रमुख स्पर्धेबरोबर प्रथमच 8 ते 12 वयोगटातील मुलांसाठी किड्स लीग स्पर्धा खेळविण्यात येणार असुन यामध्ये 40 खेळाडूंचा समावेश आहे.
या लढतीमध्ये दोन्ही संघात मिळून बॅडमिंटन व टेबल टेनिस प्रकारात आठ सामने आणि टेनिस प्रकारात सात सामने असे एकूण 23 सामने होणार आहेत. तसेच, प्रत्येक क्रीडा प्रकारात खेळाडूला त्याच्या खेळातील क्षमतेनुसार स्टार देण्यात येणार आहे. तसेच, स्पर्धेत या तीनही क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार असल्याचे त्यांनी नमुद केले. या तीनही क्रीडा प्रकारात खुल्या दुहेरी गटाचे सामने प्रत्येकी 30 गुणांचे तर, याशिवाय टेनिस प्रकारात 6 व 7चे सामने प्रत्येकी 20गुणांचे असणार आहेत.
स्पर्धेसाठी 210 खेळाडूंची निवड लिलाव पध्दतीने करण्यात आली असून हे खेळाडू सहा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.यामध्ये तन्मय चोभे(3600, तलवार्स)
सर्वात महागडा खेळाडू ठरला असून त्यानंतर या खेळाडूंमध्ये ईशान तळवळकर, तेजस किंजवडेकर, सिध्दार्थ मराठे यांचा समावेश आहे.
स्पर्धेतील सहभागी संघ व संघमालक यामध्ये
एक्स्कॅलिबर्स्-अभिषेक ताम्हाणे व मधुर इंगळहाळीकर
किर्पान्स – नंदन डोंगरे
कॅप्स कुकरीज्-प्रांजली नाडगोंडे
रावेतकर मस्कीटर्स – अमोल रावेतकर, पराग चोपडा
पंडित जावडेकर तलवार्स-शिवकुमार जावडेकर
बदामीकर अय्यर कोल्ट्स-अथर्व अय्यर व सिध्दार्थ बदामीकर यांचा समावेश आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये अभिषेक ताम्हाणे, तुषार नगरकर, तन्मय आगाशे, सारंग लागु, रणजीत पांडे, देवेंद्र चितळे, केदार नाडगोंडे, नंदन डोंगरे यांचा समावेश आहे.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान