पुणे, दि. २८/०२/२०२३- शहरातील येरवडा आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहशत माजविणार्या सराईत गुन्हेगारविरुद्ध
एमपीडीएनुसार स्थानबद्ध तेची कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
मोहसिन अन्वर खान उर्फ शेख, वय-३२ वर्षे, रा. जिजामाता नगर, नवी खडकी, असे कारवाई करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे.
सराईत मोहसीन याने साथीदारांसह येरवडा व विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता, तलवार, कु-हाड या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, विनयभंग, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते. त्यामुळे याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक. बाळकृष्ण कदम आणि पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी संबंधित आरोपीचा एमपीडीएचा प्रस्ताव पाठविला.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त, रितेश कुमार यांनी मोहसीन विरुद्ध एम. पी. डी. ए. कायद्यान्वये कारवाई करीत त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृह स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. शहरात दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पोलीस आयुक्त यांनी कार्यभार स्विकारल्या नंतरची एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई ने गुन्हेगारांचे कृत्यांना आळा बसत आहे.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.