पुणे, 11/02/2023: शहरात कोयता गँगने दहशत माजविण्याचे सत्र सुरू आहे. कोयता उगारुन दहशत माजविण्याचे ग्रामीण भागात सुुरू झाले आहेत. नगर रस्त्यावरील शिक्रापूर भागात कोयते उगारुन समाजमाध्यमात ध्वनीचित्रफित प्रसारित करुन दहशत माजविणाऱ्या तिघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली.
या प्रकरणी ओंकार उर्फ पांडा बाळासाहेब कुंभार (वय २३), दुर्वेश शिवाजी क्षेत्री (वय २३), दिलावर सुभान शेख (तिघे रा. शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कुंभार, क्षेत्री, शेख यांनी समाजमाध्यमावर ध्वनीचित्रफित प्रसारित केली होती. तिघांनी कोयते उगारून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तिघे जण कोयता, तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्वरीत कारवाई केली. आरोपी ओंकार कुंभारला पकडले. त्याच्याबरोबर असलेले साथीदार दुर्वेक्ष क्षेत्री, दिलावर शेख कोयता रस्त्यावर टाकून पसार झाले.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, उपअधीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक फाैजदार जितेंद्र पानसरे, श्रीमंत होनमारे, अमोल दांडगे, मिलिंद देवरे आदीनी ही कारवाई केली.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही