October 14, 2025

समाज कल्याण विभागाच्या राजगुरुनगर येथील वसतिगृहात विद्यार्थीनींनी प्रवेश घेण्याचे आवाहन

पुणे, २० जून २०२५: समाज कल्याण विभागाच्या बी.सी.ई.बी.सी मुलींचे शासकीय वसतिगृह राजगुरुनगर ता. खेड, जि. पुणे या वसतिगृहात इयत्ता 8 वी व पुढील शिक्षण घेत असलेल्या मागासवगीय अनु.जाती, अनु. जमाती, वि.जा.भ.ज. आ.मा.प्रवर्ग, वि.मा. प्रवर्ग, अपंग व अनाथ मुलींना https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, अधिकाधिक विद्यार्थीनींनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन गृहपाल यांनी केले आहे.

या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनींना निवास, भोजन, स्टेशनरी साहित्य, अंथरूण पांघरून व दरमहा खर्चासाठी प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे निर्वाह भत्ता व स्वच्छता प्रसाधनासाठी प्रत्येकी 100 रुपये देण्यात येतात.

अधिक माहितीसाठी बी.सी.ई.बी.सी. मुलींचे शासकीय वसतिगृह राजगुरुनगर ता खेड, पुणे येथील गृहपाल पी.व्ही. आंबले यांच्याशो संपर्क साधावा, असे परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.