पुणे, 23 ऑक्टोबर 2024 : जिल्ह्यातील २०९-शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून अमित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली आहे.
श्री. अमित कुमार यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०४ असा असून संपर्क क्रमांक ८४३२५२०२४४ असा आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी मनिष जाधव हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९३०७८०८४८९ असा आहे. श्री. अमित कुमार सकाळी १० ते १२ या वेळेत व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे या ठिकाणी भेटतील, असे शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही