पुणे, ०६/०९/२०२४:पुण्यनगरीचे ग्रामदैवत मानाचा पहिला श्री. कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे, दरवर्षीप्रमाणे कसबा कला करंडक आयोजित करण्यात आला.
कसबा कला करंडक म्हणजे होतकरू कलाकारांच्या सुप्त कलागुणांना बहरू देणारे व्यासपीठ. यावर्षीचा कला करंडक रविवारी, ०२ सप्टेंबर, २०२४ रोजी नवीन मराठी शाळा, मुख्य सभागृह येथे पार पडला. त्यावेळी ३० हुन अधिक संख्येने कलाकारांनी भाग घेतला होता. विविध कलागुण सादर करत सर्वांनी गणरायाची सेवा केली.
कलागुण सादर करताना सर्व विद्यार्थ्यांचा, सादरकर्त्यांचा आनंद आणि उत्साह गगनात मावेनासा झाला.
मंगलमय अश्या वातावरणात कसबा कला करंडक आनंदात पार पडला. ह्यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, विश्वस्त सौरभ धोकटे, निलेश वकील, सभासद आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही