October 14, 2025

अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत पीवायसी अ, पीवायसी ब, एमडब्ल्यूटीए क संघांची विजयी सलामी

पुणे, दि.14 डिसेंबर 2024: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित व आयकॉन ग्रुप पुरस्कृत अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी अ, पीवायसी ब, एमडब्ल्यूटीए क या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव सलामी दिली.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत पीवायसी अ संघाने एमडब्ल्यूटीए ब संघाचा 15-8 असा पराभव करून विजयी सलामी दिली. पीवायसी अ संघाकडून प्रशांत गोसावी, सारंग देवी, अमित लाटे, मिहिर दिवेकर यांनी सुरेख कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात संग्राम पाटील, रोहन जमेनिस, अंकुश मोघे, कल्पक पत्की, अजिंक्य मुठे, अमोल काणे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी ब संघाने ओडीएमटी नटराज 1 संघाचा 18-7 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. अन्य लढतीत एमडब्ल्यूटीए क संघाने टेनिस चॅम्प्स संघाचा 18-3 असा पराभव केला. विजयी संघाकडून उमेश भिडे, नितीन गवळी, अमेय पुराणिक, हरकिरत सिंग, संतोष शहा, जितेंद्र जोशी यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

याआधी स्पर्धेचे उदघाटन आशा साने, पराग टेपण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी जिमखाना व स्पोर्ट्स फाउंडेशनचे संचालक डॉ. अभय जमेनीस, पीवायसीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य नंदन डोंगरे, क्लब च्या टेनिस विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: साखळी फेरी:
पीवायसी अ वि.वि.एमडब्ल्यूटीए ब 15-8(90अधिक दुहेरी: प्रशांत गोसावी/सारंग देवी वि.वि.संजय आशेर/पार्थ एम 6-2; खुला दुहेरी: अमित लाटे/मिहिर दिवेकर वि.वि.प्रफुल्ल नागवानी/विक्रम जी 6-0; खुला दुहेरी: पंतसचिव/तन्मय चोभे पराभुत वि.गजानन कुलकर्णी/अर्णब बी 3-6);

पीवायसी ब वि.वि.ओडीएमटी नटराज 1 18-7(90 अधिक दुहेरी: संग्राम पाटील/रोहन जमेनिस वि.वि.निनाद देशमुख/संतोष बंदारे 6-0; खुला दुहेरी: अंकुश मोघे/कल्पक पत्की वि.वि.सचिन गुजर/ऋषिकेश अधिकारी; 6-6 खुला दुहेरी: अजिंक्य मुठे/अमोल काणे वि.वि. तेजस पोळ/राहुल मंत्री 6-4);

एमडब्ल्यूटीए क वि.वि.टेनिस चॅम्प्स 18-3(90 अधिक दुहेरी: उमेश भिडे/नितीन गवळी वि.वि.रवींद्र लाळे/निलेश ओस्तवाल 6-1; खुला दुहेरी: अमेय पुराणिक/ हरकिरत सिंग वि.वि. पुष्पक बलदोटा/संकेत बागमार 6-1; खुला दुहेरी: संतोष शहा/जितेंद्र जोशी वि.वि.अरविंद बनसोडे/हर्षल ओसवाल 6-1);