पुणे, दि. २७ मे, २०२४ : महाकवी ग दि माडगूळकर आणि संगीतकार गायक सुधीर फडके यांच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणाऱ्या ‘गदिमा आणि बाबूजी’ या दृक श्राव्य कार्यक्रमाचे आयोजन हिंदू महिला सभा यांच्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवार दि. ३१ मे रोजी सायं ५ वाजता सदाशिव पेठेतील म. ए. सो च्या भावे प्राथमिक शाळा सभागृह या ठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न होईल. कार्यक्रमासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार असून काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी. सदर कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती ही सुगम संगीत अभ्यासक असलेल्या श्रीपाद उंब्रेकर यांची असून ते स्वत: कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही