October 15, 2025

‘भुजबळांची आता लाड खूप झाले’ – स्वपक्षीय मंत्र्याने केली टीका

पुणे, ४ जानेवारी २०२४: महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजगी व्यक्त केली होती. त्यांची ही नाराजगी अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत कृषी मंत्री डॉ. माणिकराव कोकाटे यांनी पुण्यात धक्कादायक विधान केले. ‘ते कधी नाराज होते आणि तुम्हाला कोणी सांगितल की ते नाराज आहे. तसच माझे नेते हे अजित पवार आणि आत्ता राज्याचे मुख्यमंत्री असून बाकी दुसर कोणीही माझं नेता नाही./त्यांचे पक्षाने पुष्कळ लाड केलं आहेत. आता किती लाड करायचं अस म्हणत कोकाटे यांनी भुजबळ यांना टोला लगावला.

राज्याचे कृषी मंत्री डॉ. माणिकराव कोकाटे यांची आज पुण्यात पत्रकार परिषद झाली.त्यावेळी त्यांनी हे विधान केले.

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीक विमा घोटाळ्याचा परळी पॅटर्न राबविण्यात आल्याचं सांगितल आहे.याबाबत कोकाटे यांना विचारलं असता ते म्हणाले की याबाबत अधिवेशनात मुख्यमंत्री यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी त्यांच्या पातळीवर काही चौकशी या लावल्या आहे.आणि त्या चौकशी पूर्ण झाल्यास ते अहवाल हे सदर करतील.अद्याप कुठलाही अहवाल आलेला नाही.तसेच ज्यांनी ज्यांनी गैरप्रकार केलं आहे त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाणार आहे.सुरेश धस यांनी जे काही सांगितल आहे त्याबाबत मुख्यमंत्री स्थरावर चौकशी सुरू आहे.अस यावेळी कोकाटे म्हणाले.

यावेळी कोकाटे यांना लाडक्या बहीण मुळे मजूर रेट वाढले आहे याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की तसेच मजूर रेट हे वाढलेच आहे.पुरुषांनी बहिणीवर अवलंबून न राहता काम केलं पाहिजे.आमचं ठीक आहे आम्हाला निवडणुकीत बहिणींची गरज होती.अस यावेळी कोकाटे म्हणाले.

पंतप्रधान किसान योजना आणि लाडकी बहीण योजनेचा महिलांना एकत्रित लाभ मिळणार नाही.याबाबत कोकाटे यांना विचारलं असता ते म्हणाले की एका वेळेस दोन योजनांचा लाभ घेता येत नाही.त्यामुळे तो निर्णय त्या महिलांनी घेतला पाहिजे.त्यांना लाडकी बहीण योजना पाहिजे की पंतप्रधान योजना पाहिजे याबाबत त्यांनी निर्णय घ्यायचं आहे.येणाऱ्या २०२९ च्या निवडणुकीत महिला आरक्षणाचा बिल लोकसभेत आणि विधानसभेत येणार आहे.आणि आत्ता येणाऱ्या काळात 50 टक्के महिला लोकप्रतिनिधित्व करणार आहे.अस यावेळी कोकाटे म्हणाले.