पुणे, ०३ जानेवारी २०२६: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, पुणे शहर प्रभाग क्रमांक २० (बिबवेवाडी – शंकरमहाराज मठ) येथील उमेदवारांनी आज जोमाने प्रचार केला.
भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री. राजेंद्र आबा शिळीमकर, सौ. तन्वी प्रशांत दिवेकर, सौ. मानसी मनोज देशपांडे तसेच श्री. महेंद्र सुंदेचा मुथ्था यांनी सकाळी ठीक १० वाजता प्रचाराला सुरुवात केली. सकाळच्या सत्रात मुद्रा सोसायटी, जितू पार्क, शाहू सोसायटी, ऐश्वर्या पार्क, सेलीला अपार्टमेंट, महावीर पार्क, कोटेश्वर सोसायटी तसेच राव हॉस्पिटल परिसर येथे प्रत्यक्ष भेटी देत नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
या दरम्यान उमेदवारांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांना गांभीर्याने ऐकून घेतले. परिसरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक, सुरक्षितता तसेच सर्वांगीण विकास या विषयांवर नागरिकांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यानंतर सायंकाळी ५ वाजता प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात सूर्यप्रभा गार्डन सुरुवात, विष्णुविहार, केंजळे नगर, कुमार पार्क, तोडकर गार्डन आणि वास्तूनगर सोसायटी या भागांत प्रचार फेरी काढण्यात आली. या वेळीही मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचे स्वागत केले.
भाजपाच्या उमेदवारांनी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरात विकासाभिमुख, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रभाग क्रमांक २० चा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे वेळेत निराकरण आणि सुशासन हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केले.
या प्रचारात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

More Stories
Pune: २४ तास प्रभागातील नागरिकांच्या सेवेत उपलब्ध राहणार: राघवेंद्र बाप्पु मानकर
प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार
माघारीनंतरही रण तापले; पुण्यात १,१६५ उमेदवार रिंगणात