January 3, 2026

भाजपची दोन जागांवर आघाडी दोन उमेदवार झाले बिनविरोध नगरसेवक

पुणे, २ जानेवारी २०२५: पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपसाठी आनंदाची बातमी आली असून प्रभाग क्रमांक 35 माणिकबाग सन सिटी येथून मंजुषा नागपूर आणि श्रीकांत नागपुरे हे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांच्यासमोर असलेल्या उमेदवारांनी माघार घेतल्याने हा विजय निश्चित झाला. त्यामुळे 165 जागांवर निवडणुका होत असताना भाजपने मतदानापूर्वीच दोन जागांवर आघाडी घेतली आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. भाजपने 165 जागांवर पैकी 158 उमेदवार उभे केले आहेत. तर सात ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे उमेदवार उभे आहेत. आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे कोण माघार घेणार, बंडखोरी रोखणार का याची चर्चा सर्वत्र सुरू असताना भाजपसाठी हा अनपेक्षित निकाल आलेला आहे. मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.

नागपुरे यांचे पती दीपक नागपूरे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवण्याची तयारी केलेली होती. त्यामुळे पुढील काळात ते पक्षातील नेत्यांना डोळे जड होऊ शकतात यामुळे काही नेत्यांनी नागपुरे यांची उमेदवारी कापण्याचा प्रयत्न केलेला होता. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूरे यांचे नाव सुचवलेले होते आणि पक्षाच्या अंतर्गत सर्वे देखील नागपूरे यांचे नाव आघाडीवर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील या जागेवर लक्ष असल्याने नागपुरे यांची उमेदवारी कापता आली नाही. नागपुरे, जगताप यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केलेली असताना आज मात्र त्यांची बिनविरोध निवड झाल्याने एक नवा विक्रम झाला गेला आहे.