पुणे, २५ मार्च २०२५: शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाअंतर्गत केंद्र शासनाच्या एन.एस.टी.एफ.डी.सी. नवी दिल्ली पुरस्कृत तसेच राज्य शासन पुरस्कृत योजनेंतर्गत आदिवासी सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना व्यवसायासाठी अल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत असून ७ एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय निहाय घोडेगाव, राजूर, सोलापूर व छत्रपती संभाजीनगर या कार्यालयांना राज्य शासनाचा १६ व केंद्र शासनाचा ३९ लक्षांक प्राप्त झालेला आहे. या योजनेचा लाभ शबरी शाखा कार्यालय जुन्नर कार्यक्षेत्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराधीव, बीड, लातूर या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.
या योजनेंतर्गत स्वयंसहायता बचत गटांना ५ लाख रुपयांचे व्यवसाय कर्ज, ऑटो वर्कशॉप किंवा स्पेअरपार्ट व्यवसायासाठी ५ लाख रुपये, लहान उद्योग व्यवसायासाठी २ लाख रुपये, ऑटो रिक्षा किंवा मालवाहू रिक्षा साठी ३ लाख रुपये, वाहन व्यवसायासाठी १० लाखापासून ते १५ लाख रुपयांपर्यंत व्यवसाय कर्ज अल्प व्याज दरात देण्यात येते. सदर कर्ज योजनेत कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही.
या योजनेचे अर्ज https://mahashabari.in या संकेत स्थळावर भरावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी हे संकेतस्थळ तसेच महामंडळाचे जुन्नर शाखा कार्यालय, महसूल भवन, नवीन बस स्थानकाच्या बाजूला, जुन्नर येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्र. ०२१३२- २९५४७३ ई-मेल आयडी shabarijunnar@gmail.com वर संपर्क साधावा. आदिवासी लाभार्थ्यांनी या कर्ज योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे शाखा व्यवस्थापक राहुल पाटील यांनी केले आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही