March 5, 2026

सहाव्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ क्रिकेट स्पर्धेत केडन्स संघाचा तिसरा विजय

पुणे, 7 फेब्रुवारी 2026- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व महाराष्ट्र क्रिकेट संघटना(एमसीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सहाव्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत आर्य पानसे(3-21) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर केडन्स संघाने डीएआरसी संघाचा 6 गडी राखून पराभव करत तिसरा विजय मिळवला.

पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर झालेल्या लढतीत केडन्स संघाच्या आर्य पानसे(3-21), शौर्य पारखे(3-32), ओंकार मोहिते(2-40), शुभम कदम(1-4) यांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे डीएआरसी संघाचा डाव 27.3 षटकात सर्वबाद 110धावावर कोसळला. यात सुशांत गोंदकर 29, मिहीर किल्लेदार 24, कुणाल भोसले 12 यांनी थोडासा प्रतिकार केला

हे आव्हान केडन्स संघाने 25.5 षटकात 4बाद 111धावा करून पूर्ण केले. यात हर्षल काटेने 20चेंडूत 4चौकार व 1षटकाराच्या मदतीने 28, सुश्रुत सावंतने 62चेंडूत 1चौकाराच्या मदतीने नाबाद 24 धावा केल्या. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 38चेंडूत 36 धावांची संयमी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्याचा मानकरी आर्य पानसे ठरला.

निकाल: साखळी फेरी:
पीवायसी क्रिकेट मैदान:
डीएआरसी: 27.3 षटकात सर्वबाद 110धावा(सुशांत गोंदकर 29(45,4×4), मिहीर किल्लेदार 24(44,2×4,1×6), कुणाल भोसले 12, आर्य पानसे 3-21, शौर्य पारखे 3-32, ओंकार मोहिते 2-40, शुभम कदम 1-4) पराभुत वि. केडन्स: 25.5 षटकात 4बाद 111धावा(हर्षल काटे 28(20,4×4,1×6), सुश्रुत सावंत नाबाद 24(62,1×4), अथर्व धर्माधिकारी 11, धीरज ढेरे 11, पार्थ सानप 2-22, फैज शेख 1-16, कुणाल त्रिपाठी 1-35); सामनावीर – आर्य पानसे; केडन्स संघ 6 गडी राखून विजयी.