पुणे, २२/०२/२०२५: मध्य रेल्वे होळीच्या सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई – नागपूर / मडगाव / नांदेड आणि पुणे – नागपूर दरम्यान २८ होळी विशेष ट्रेन चालवणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत:
१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष (८ सेवा)
ट्रेन क्रमांक 02139 ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. ०९.०३.२०२५, ११.०३.२०२५, १६.०३.२०२५ आणि १८.०३.२०२५ (रविवार आणि मंगळवार) रोजी ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.१० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 02140 ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन नागपूर येथून दि. ०९.०३.२०२५, ११.०३.२०२५, १६.०३.२०२५ आणि १८.०३.२०२५ (रविवार आणि मंगळवार) रात्री ८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल.
संरचना: एक प्रथम वातानुकूलित, एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, १० तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापुर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा)
ट्रेन क्रमांक 01151 साप्ताहिक विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. ०६.०३.२०२५ आणि १३.०३.२०२५ (गुरुवार) रोजी ००.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01152 ही साप्ताहिक विशेष ट्रेन मडगाव येथून दि. ०६.०३.२०२५ आणि १३.०३.२०२५ (गुरुवार) रोजी दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.
संरचना: एक प्रथम वातानुकूलित, एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, १० तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.
३. लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 01129 साप्ताहिक विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १३.०३.२०२५ आणि २०.०३.२०२५ (गुरुवार) रोजी २२.१५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01130 ही साप्ताहिक विशेष ट्रेन दि. १४.०३.२०२५ आणि २१.०३.२०२५ (शुक्रवार) रोजी मडगाव येथून
दुपारी २.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल.
संरचना: एक प्रथम वातानुकूलित, २ वातानुकूलित द्वितीय, सहा वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान,१ पॅन्ट्री कार आणि २ जनरेटर कार.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.
४. लोकमान्य टिळक टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा)
साप्ताहिक विशेष ट्रेन क्रमांक 01105 दि. १२.०३.२०२५ आणि १९.०३.२०२५ (बुधवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री ००.५५ वाजता सुटेल आणि नांदेड येथे त्याच दिवशी रात्री ९.०० वाजता पोहोचेल.
साप्ताहिक विशेष ट्रेन 01106 ही नांदेड येथून १२.०३.२०२५ आणि १९.०३.२०२५ (बुधवार) रोजी रात्री २२.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.०५ वाजता पोहोचेल.
संरचना: एक प्रथम वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ४ सेकंड सीटिंग, १ पॅन्ट्री, १ जनरेटर व्हॅन आणि १ सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन
थांबे: ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, बारसी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा
५. पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष (४ सेवा)
साप्ताहिक विशेष ट्रेन क्रमांक 01469 ही दि. ११.०३.२०२५ आणि १८.०३.२०२५ (मंगळवार) रोजी पुणे येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.३० वाजता पोहोचेल.
साप्ताहिक विशेष ट्रेन क्रमांक 01470 नागपूर येथून दि. १२.०३.२०२५ आणि १९.०३.२०२५ (बुधवार) रोजी सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पोहोचेल.
संरचना: तीन वातानुकूलित द्वितीय, १५ वातानुकूलित तृतीय, १ सामान्य द्वितीय श्रेणी श्रणीसह कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.
६. पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष (४ सेवा)
विशेष ट्रेन क्रमांक 01467 ही पुणे येथून दि. १२.०३.२०२५ आणि १९.०३.२०२५ (बुधवार) रोजी दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता पोहोचेल.
विशेष ट्रेन क्रमांक 01468 ही नागपूर येथून दि. १३.०३.२०२५ आणि २०.०३.२०२५ (गुरुवार) रोजी सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पोहोचेल.
संरचना: एक प्रथम वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित , दोन तृतीय वातानुकूलित, ५ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
01469/01470 आणि 01467/01468 साठी थांबे: – उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा
आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 02139/02140, 01151/01152, 01129/01130, 04169/04170, 01467/01468 आणि 01105 चे बुकिंग दि. २४.०२.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरू होईल.
तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही