October 15, 2025

कैद्यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणांबाबत भरपाई धोरण

पुणे, १५ एप्रिल २०२५ः राज्यातील कारागृहांमध्ये कोठडीत असलेल्या कैद्यांचा मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्यास त्यांच्या वारसांना भरपाई देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सूचनेनुसार मंजुरी देण्यात आली आहे.

अपघात, वैद्यकीय निष्काळजीपणा, मारहाण किंवा कैद्यांमधील भांडणामुळे मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये भरपाई मिळेल. आत्महत्येच्या प्रकरणात १ लाख रुपये भरपाइ असेल. वार्धक्य, दीर्घ आजार, पलायन करताना अपघात, उपचार नाकारल्यास भरपाई नाही. भरपाई देण्याआधी चौकशी, शवविच्छेदन, पंचनामा आदी आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक असणार आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचाही निर्णय असणार आहे. या धोरणामुळे कारागृह व्यवस्थापनावर जबाबदारी वाढेल तसेच कैद्यांच्या मानवाधिकारांचे रक्षण होईल.