पुणे, २१ जानेवारी २०२६ (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी–मार्च २०२६ या कालावधीत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मानसिक आधार व योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दि. १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत, तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा दि. २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान होणार आहेत. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षा दडपण, भीती किंवा अन्य अडचणी भासल्यास त्यावर मार्गदर्शन मिळावे आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुणे विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहिल्यानगर (नगर) आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी समुपदेशक नियुक्त करण्यात आले असून, विद्यार्थी व पालक सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत थेट संपर्क साधू शकतात, अशी माहिती पुणे विभागीय मंडळाच्या सचिव डॉ. मिनाक्षी राऊत यांनी दिली.
नियुक्त तज्ज्ञ समुपदेशक पुढीलप्रमाणे –
पुणे:
▪️ योगिनी पाटील – ९९६०६४४४११
▪️ आशुमती देशपांडे – ७९७२५७३७४२
▪️ वृषाली आठवले – ९८३४०८४५९
बारामती:
▪️ श्रेया दिघे – ९३५९९७८३१५
अहिल्यानगर:
▪️ सुनील मोरे – ८१६९२०२२१४
▪️ सुजित भोसले – ९३७१६६१२५५
▪️ विजया कुलकर्णी – ७२०८४२९३८१
सोलापूर:
▪️ निकिता गडाख – ७७०९१५६०६८
▪️ सुजाता शिंदे – ८४२११५०५२८
▪️ वरदा रानडे – ९४०४७८३९९६
तसेच परीक्षा काळात मंडळासंबंधी माहिती व मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
▪️ इयत्ता १० वी: ९४२३०४२६२७
▪️ इयत्ता १२ वी: ७०३८७५२९७२
या क्रमांकांवर सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी तणाव न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे व आवश्यकतेनुसार या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

More Stories
Pune: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना
तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रो स्थानकावरील AFC गेट्स; पुणे मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय
Pune: ई-चलनाविरोधात ५ मार्चपासून वाहतूकदारांचे बेमुदत आंदोलन