April 24, 2024

18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत डॉइश बँक, एफआयएस ग्लोबल संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पुणे, 26 फेब्रुवारी, 2024: अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने व आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित 18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत डॉइश बँक, एफआयएस ग्लोबल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पीसीएमसी येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अनिल तेवानी(52धावा व 4-16) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर डॉइश बँक संघाने सायबेज सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड संघाचा 72 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना डॉइश बँक संघाने 20 षटकात 5बाद 173धावा केल्या. यात अनिल तेवानी 52, पंकज लालगुडे 44, मधु कामत 18, ओंकार तांदुळवाडकर 18 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. याच्या उत्तरात सायबेज सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड संघ 16.1 षटकात सर्वबाद 101धावावर संपुष्टात आला. यात आशिष ढमाल 22, विपुल सिंग 21, पुरुषोत्तम पाठक 17 यांनी थोडासा प्रतिकार केला. डॉइश बँककडून अनिल तेवानी(4-16), तरण दीप सिंग(2-16)यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 72 धावांनी विजय मिळवून दिला.

दुसऱ्या सामन्यात निखिल भुजबळ याने नाबाद 65 धावांच्या जोरावर एफआयएस ग्लोबल संघाने यार्डी संघाचा 7 धावांनी पराभव करून अंतिम आठ संघात प्रवेश केला.

निकाल: साखळी फेरी:
डॉइश बँक: 20 षटकात 5बाद 173धावा(अनिल तेवानी 52(45,8×4), पंकज लालगुडे 44(15,7×4,2×6), मधु कामत 18, ओंकार तांदुळवाडकर 18, अनिरुद्ध पवार 2-20, रोहित देवगावकर 1-13) वि.वि.सायबेज सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड: 16.1 षटकात सर्वबाद 101धावा(आशिष ढमाल 22, विपुल सिंग 21, पुरुषोत्तम पाठक 17, अनिल तेवानी 4-16, तरण दीप सिंग 2-16); सामनावीर – अनिल तेवानी; डॉइश बँक संघ 72 धावांनी विजयी;

एफआयएस ग्लोबल: 20षटकात 5बाद 177धावा(निखिल भुजबळ नाबाद 65(43,9×4,1×6), ऋत्विक महाजन 47(24,6×4,2×6), प्रशांत पोळ 21, त्रिदीप महातो 19, ऋषीकेश पटवर्धन 2-28, सौरभ देवरे 2-43) वि.वि.यार्डी: 20 षटकात 6बाद 170धावा (प्रीतम गुजारे 53(27,4×4,4×6), सौरभ जळगावकर 40(27,6×4,2×6), चेतन राणे नाबाद 23, पियुल वंजारी 3-21, प्रशांत पोळ 2-17); सामनावीर – निखिल भुजबळ; एफआयएस ग्लोबल संघ 7 धावांनी विजयी;