October 15, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बोपखेल परिसरात भारतीय संविधान वाटप

पुणे, १४ एप्रिल २०२५: भारतीय संविधान निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असलेले योगदान, भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्य याबाबतची जनजागृती व जगभरातील राज्य घटनांचा अभ्यास व्हावा या उदात्त हेतूने बोपखेल (रामनगर-गणेशनगर) भागात आज ५१ नग “भारतीय संविधान” देवुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या वेळी जिवन दान ट्रस्ट अध्यक्ष सुमन सोनवने उपाध्यक्ष निलिमा जाधव व ॐकार सोनवने व अशोक बाराथे विद्वान गायकवाड, किरण पाटोळे, सविता खरात, मारुती मोरे, दत्तात्रय घुले, विजय सोनवणे, ॐकार बजबळे, रविंद्र वडमारे, अरुण मोरे, संकेत पाटील, विशाल भोसले, रोहिदास जोशी, सचिन कदम इ. उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न सत्यात आणायचं असेल तर पहिलं त्यांनी सांगितलेल्या विचारांना समजून घ्यावं लागेल. त्यांचे विचार आत्मसात करावे लागतील. आणि त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करावं लागेल. बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र अंमलात आणावंच लागेल असे भाग्यदेव घुले म्हणाले सदरील कार्यक्रमचे आभार संतोष गायकवाड ह्यांनी मांडले