पुणे, १६ जून २०२५: शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वानवडी येथील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ६२ बी येथील शाळेत जावून विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच वाटप करण्यात आले.
यावेळी पुणे महानगरपालिकेच्या वानवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त अमोल पवार, सहायक प्रशासकीय अधिकारी शंकर मांडवे, पर्यवेक्षक बाळासाहेब अस्तुळ, राजश्री दैठणकर, मुख्याध्यापक बागेश्री चव्हाण (मराठी शाळा), किशोर वरबडे (इंग्रजी शाळा), शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी श्री.डुडी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही