पुणे, 03 मे 2024: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता यावे यासाठी पुणे शहरात वॉर्डनिहाय मतदार सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
मतदार सहायता कक्षाचा संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. औंध बाणेर 020-29912679, ढोले पाटील रोड 020-29995164, विश्रामबाग वाडा 020-29950782, भवानी पेठ 020-29950749, घोले रोड 020-29950672, कर्वे नगर 020-29900101, कोंढवा 9373949573, वानवडी 020-29980508, येरवडा 020-29913010, हडपसर 020-29980410, सिंहगड रोड 020-29950768, नगर रोड 020-29913491, बिबवेवाडी 020-29950752, धनकवडी 020-29950746, कोथरुड 020-29950838.
सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यत ही सेवा उपलब्ध असून नागरिकांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही