May 16, 2024

सुकन्या समृद्धी आणि टाईम डिपॉझिट योजनेत फसवणूक, पुण्यात सहा पोस्टल अधिकाऱ्यांवर गुन्हा

पुणे, २५/०३/२०२३: पुण्यात पोस्ट खात्याच्या खातेदारांच्या टाईम डिपॉझिटमध्ये उपडाक अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रकमेचा  मोठा अपहार केल्याचे पुढे आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोस्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सात जणांवर विश्रांतवाडी, विमाननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्योतिराम फुलचंद माळी (वय ४०, दिघी उप डाकघर पोस्ट मास्टर), भगवान श्रीरंग नाईक (वय ३६, क्लार्क), गणेश तानाजी लांडे (वय ३७, धानोरी पोस्ट मास्टर), मधुकर गंगाधर सूर्यवंशी (वय ५१, धानोरी पोस्ट मास्टर) यांच्यावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तर रमेश गुलाब भोसले, विलास एच देठे यांच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी  योगेश नानासाहेब वीर (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी दिघी कॅम्पमध्ये आलेल्या एकूण २४७ टाइम डिपॉझिट खातेदारांच्या ९ कोटी ६२ लाख ९८ हजार रूपये रक्कम स्वीकारून त्यांचे धानोरी येथील शाखाडाक घरात टीडी खाते उघडण्यास लावून या रक्कमेपोटी एकूण १८ लाख ३५ रुपये धानोरी डाकघरास देऊन ही रक्कम आपापसात वाटून घेत डाक खात्याची आणि टीडी खातेदारांचा विश्वास संपादन करून त्यांच्या बनावट सह्या करून पोस्ट खात्याची फसवणूक केली.

शाखा डाकपाल ९ बीआरडी, यानी डंकर्क लाईन मध्ये आलेल्या एकुण ५९ TD गुंतवणुकदारांची एकुण २ कोटी ४० लाख ६० हजार  रुपये एवढी रक्कम स्विकारुन ही  ९ बीआरडी डाकघरामध्ये TD खाते  उपडण्यास लावून त्या रक्कमेपोटी एकूण कमिशन रक्कम ४ लाख ९५ हजार २०० रुपये पैकी ७५ टक्के रक्कम आरोपी कोळीने  स्वतः घेवुन २५ टक्के रक्कम ही ९ बीआरडी शाखा डाकपाल  यांनी आपआपसात वाटुन घेवून डाकयात्याची आणि TD वातेदारांचा विश्वास संपादन करून त्यांचे बनावट सहया करून भारतीय पोस्ट बात्याची फसवणुक केली.

तसेच आरोपींनी  विमाननगर  येथील उप डाकघरात उप डाकपाल म्हणून कार्यरत असताना उप डाकघरात त्यांनी आवर्ती ठेवबात  आणि सुकन्या समृध्दी योजना अंतर्गत खातेदारांनी त्यांच्या वात्यात रक्कम जमा करण्यासाठी काऊंटरवर आल्यानंतर त्यांची रक्कम स्विकारुन खातेधारकांकडे असलेल्या पासुबकवर रक्कम स्विकारन्या बाबत तारखेचे शिक्के मारुन शासकीय फिनाकल प्रणाली मध्ये त्यांची नोंद घेण्याची जबाबदारी विश्वासाने दिली असताना आरोपीने १९ खातेदारांनी आवर्ती ठेवखाते TD आणि सुकन्या समृध्दी योजना या योजने अंतर्गत बात्यांमध्ये विविध तारखांना जमा केलेली एकूण ४५ हजारांची  रक्कम  सरकारी हिशोबामध्ये  जमा न करता आर्थिक गैरव्यवहार करुन डाकखात्याची आणि १९ खातेदारांची  फसवून केली.