March 4, 2026

पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत गरगंटू डिस्ट्रॉयर्स, के-प्रा पिकलर्स संघांची विजयी सलामी

पुणे, दि.4 मार्च, 2026 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत गरगंटू डिस्ट्रॉयर्स, के-प्रा पिकलर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील पिकलबॉल कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत गरगंटू डिस्ट्रॉयर्स संघाने विश्राम वॉरियर्स संघाचा 6-2 असा पराभव करून विजयी सलामी दिली. विजयी संघाकडून इशांत रेगे, साहिल गवारे, सुधांशू मेडसीकर, ओजस साबडे, केदार नाडगोंडे, कर्णा मेहता, रोहन पुसाळकर, समिर पलनीतकर, यशोधन पानसे, सलील चोदणकर, हर्षल बाकरे, रोहित अग्रवाल यांनी सुरेख कामगिरी बजावली.

दुसऱ्या सामन्यात यश शहा, संग्राम पाटील, वैजयंती मराठे, गौरव पाटील, तुषार नगरकर, संजीव घोलप, यश मेहेंदळे, चैत्रा आपटे, रौनक टिळक, अजिंक्य शेट्टी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर के-प्रा पिकलर्स संघाने पिकी ब्लाईंडर्स संघाचा 5-3 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. याआधी स्पर्धेचे उद्घाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, मानद सचिव दिपक गाडगीळ, सहसचिव सारंग लागू, पुसाळकर फाउंडेशनचे रोहन पुसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जुई पुसाळकर, क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, क्लबच्या पिकलबॉल विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, चॅम्पियन स्पोर्टसचे अमित मदन, साहिल मदन, अविनाश रानडे, आमोद प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: साखळी फेरी:
गरगंटू डिस्ट्रॉयर्स वि.वि. विश्राम वॉरियर्स 6-2(खुला दुहेरी 1: इशांत रेगे/साहिल गवारे वि.वि. आदित्य अभ्यंकर/अनुज मेहता 11-10; खुला दुहेरी 2: सुधांशू मेडसीकर/ओजस साबडे वि.वि. रोहन राजापूरकर/मोनीश गोखले 11-00; खुला दुहेरी 3: केदार नाडगोंडे/कर्णा मेहता वि.वि. इंद्रनील कोतवाल/अखिल अत्रे 11-01; मिश्र दुहेरी 1: श्रेयस बाह्मणे/सानिका गाडगीळ पराभुत वि.सारा नवरे/सन्मय तेलंग 01-11; वरिष्ठ दुहेरी: रोहन पुसाळकर/समिर पलनीतकर वि.वि.अभय राजगुरू/आशिष देसाई 15-03; मिश्र दुहेरी 2: समीर बेलवलकर/कीर्ती श्रॉफ पराभूत वि.निशित हेगडे/क्षीरिन राजे 05-15; खुला दुहेरी 4:यशोधन पानसे/सलील चोदणकर वि.वि.प्रतीक शेट्टी/हर्षा जैन 15-10; खुला दुहेरी 5: हर्षल बाकरे/रोहित अग्रवाल वि.वि. आदित्य तापडिया/आयुष जगताप 11-07);

के-प्रा पिकलर्स वि.वि.पिकी ब्लाईंडर्स 5-3(खुला दुहेरी 1: यश शहा/संग्राम पाटील वि.वि.निमिष कुलकर्णी/करण जाधव 11-04; खुला दुहेरी 2: विनित रुकारी/राजवीर बोरावके पराभुत वि. रोहन दामले/शार्दुल वाळिंबे 00-11; खुला दुहेरी 3: आदित्य दाते/नील गोवईकर पराभुत वि.जय गुजर/कृष्णनील गोरे 00-11; मिश्र दुहेरी 1: वैजयंती मराठे/गौरव पाटील वि.वि.मुक्ता लोणकर/जय पांडे 11-00; वरिष्ठ दुहेरी: तुषार नगरकर/संजीव घोलप वि.वि. अतुल ठोंबरे/संजय शहा 11-04; मिश्र दुहेरी 2: यश मेहेंदळे/चैत्रा आपटे वि.वि. राजवर्धन जोशी/जान्हवी प्रभुदेसाई 15-09 खुला दुहेरी 4: रौनक टिळक/अजिंक्य शेट्टी वि.वि.मनीष शहा/आदित्य पावनगडकर 15-09; खुला दुहेरी 5: संवित कासट/केतन मुथा पराभुत वि.आकाश सूर्यवंशी/गौरव केतकर 05-11)