March 3, 2026

राष्ट्रीय टी20 क्रिकेट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड स्पर्धेत गुजरात व कर्नाटक यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पुणे,18 फेब्रुवारी 2026 : द पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन (पीबीएमए) आणि ब्लाईंड क्रिकेट असोसिएशन (बीसीए) तर्फे एचसीएलफाऊंडेशन च्या सहकाऱ्याने आयोजित राष्ट्रीय टी20 क्रिकेट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड स्पर्धेत गट साखळी फेरीत गुजरात, कर्नाटक या संघांनी आपली विजयी मालिका कायम ठेवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना मैदान व पद्ममावती येथील टेंबेकर मैदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीत अ गटात प्रभू हलियाल(62धावा), रंगा एन(48धावा) यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर कर्नाटक संघाने महाराष्ट्र संघाचा 32 धावांनी पराभव केला.

ब गटात संजोय दरवडा(नाबाद 105धावा) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर गुजरात संघाने पश्चिम बंगाल संघाचा 65 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या औपचारिक लढतीत सनी चौहान 1-29 व नाबाद 34) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर चंदीगढ संघाने राजस्थान संघाचा 4 गडी राखून पराभव केला.

स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात व कर्नाटक यांच्यात डेक्कन जिमखाना मैदानावर सकाळी 9.30वाजता होणार आहे.

निकाल: गट साखळी फेरी:
अ गट : डेक्कन जिमखाना मैदान :
कर्नाटक: 19 षटकात 6बाद 220धावा(प्रभू हलियाल 62(42,8×4), रंगा एन 48(38, 5×4), योगेश जे नाबाद 35(19,6×4), अभिजीत शिरोड 3-47, कृष्णा सोनवणे 2-27) वि.वि. महाराष्ट्र: 19षटकात 6बाद 188धावा(अभिजीत शिरोड 66(45,5×4), सुमीत 34, संकेत शर्मा नाबाद 28, अक्षय बी 1-34); सामनावीर – अभिजीत शिरोड; कर्नाटक संघ 32 धावांनी विजयी;

ब गट : टेंभेकर मैदान, पद्मावती
गुजरात: 20 षटकात 3बाद 225धावा(संजोय दरवडा नाबाद 105(57,16×4), गणेशभाई गणवित नाबाद 79(51, 11×4), गणेश भुसारा 12, अक्षय गोरे 3-16)वि.वि.पश्चिम बंगाल: 18.4 षटकात सर्वबाद 160धावा(अरिंदम मंडल 69(43,12×4), राहुल सोरेन 53(43,5×4), रामाभाई पारे 3-15, गणेश भुसारा 2-24, अक्षय पटेल 2-32); सामनावीर – संजोय दरवडा; गुजरात संघ 65 धावांनी विजयी;

राजस्थान: 15.3 षटकात सर्वबाद 148धावा(अमित कुमार टेलर 47(38, 5×4), राधे श्याम 24, निर्मल कुमार 10, विनय 2-9, सनी चौहान 1-29) पराभुत वि. चंदीगढ: 15.5 षटकात 6बाद 149धावा(सुमंत पोद्दार 35(23, 2×4,3×6), सनी चौहान नाबाद 34(24,3×4), विनय 22, अमित कुमार नाबाद 14, गणेश कुमार 3-21, शांतीलाल 2-35);सामनावीर – सनी चौहान; चंदीगड संघ4 गडी राखून विजयी.