पुणे, २५/०२/२०२५: विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या बाबत केलेल्या विधानावर संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं.यावेळी शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विधानाच समर्थन करत मी देखील जेव्हा पक्षात होतो तेव्हा मला देखील तेव्हा संपर्क प्रमुख यांनी मला शहराध्यक्ष पदासाठी २५ लाख मागितले असल्याचं त्यांनी सांगितलं.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने पुण्यातील अलका चौक येथे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आला यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
यावेळी शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे म्हणाले की संजय राऊत यांनी आमच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या बाबत जे काही विधान केल आहे ते एकटं नीलम गोऱ्हे यांच्याबाबत नसून तो महिलांचा अपमान आहे.त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो.भविष्यात त्यांनी जर असे विधान केले तर त्यांना शहरात फिरू देणार नाही त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करू असा इशारा यावेळी भानगिरे यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की माझ्या बाबत देखील पूर्वी जेव्हा मी शिवसेनेत होतो तेव्हा देखील जे काही संपर्क प्रमुख होते त्यांनी मला शहराध्यक्ष पदासाठी २५ लाखाची मागणी केली होती.तेव्हा शिवसेना संपर्क प्रमुख बाळा कदम होते तेव्हा त्यांच्या चेल्यांनी देखील तेव्हा २५ लाखाची मागणी केली आहे.तेव्हा जे काही चालायचं ते आम्हाला माहीत असून जास्त बोलायला लावू नये अस म्हणत नाना भानगिरे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याच समर्थन केलं.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी