मुबारक अन्सारी
पुणे, २ जानेवारी २०२४: पुणे महापालिका निवडणुकीच्या चर्चा सुरू झालेल्या असताना शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केलेली आहे त्यावरून मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थ निर्माण होत आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीमध्ये ३० ते ४० जागांवर दावा केला आहे.
नुकतंच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आत्ता लवकरच महापालिका निवडणूक होणार असून या महापालिका निवडणूकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
नाना भानगिरे म्हणाले, आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. शहरातील प्रभाग तसेच बूथ यांच्या बैठका घेत तयारी करण्यात आली आहे. ज्या जागा २०१७ साली धनुष्यबाण या चिन्हावर आमच्या पक्षाच्या वतीने लढण्यात आल्या होत्या त्या जागा शिवसेना लढवणार आहे.तसेच शहरातील ३५ ते ४० जागा या आम्ही लढवू आणि महापालिकेत महायुतीच सरकार आणणार आहोत.तसेच येणाऱ्या काळात विविध पक्षातील पदाधिकारी तसेच माजी आमदार हे देखील आमच्या संपर्कात असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच त्यांचं प्रवेश होणार असल्याच यावेळी त्यांनी सांगितल.
लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत महायुती कडून जो फॉर्म्युला वापरण्यात आलं होत तोच फॉर्म्युला या महापालिका निवडणुकीत देखील राबविण्यात यावा आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेना ही ३५ ते ४० जागा लढणार असल्याची माहिती शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिली.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी