तिसऱ्या कटककर करंडक अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो स्पर्धेत इंडियन नेव्ही, सेंट्रल रेल्वे संघांचा दुसरा विजय
पुणे, 18 फेब्रुवारी 2026: – आॅलिंपिक स्पोर्टस असलेल्या वाॅटरपोलोला प्रोत्साहन देण्यासाठी डेक्कन जिमखान्या यांच्या तर्फे आयोजित तिसऱ्या कटककर करंडक अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो स्पर्धेत साखळी फेरीत सेंट्रल रेल्वे(मध्य रेल्वे), इंडियन नेव्ही(भारतीय नौदल) या संघांनी आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसऱ्या विजयाची नोंद केली.
डेक्कन जिमखान्याच्या टिळक तलावावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सेंट्रल रेल्वे(मध्य रेल्वे) संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 23-7 असा पराभव करून विजयी सलामी दिली. विजयी संघाकडून अमल कुमार 6, अप्पू एनएस 5, उदय उत्तेकर 4, ऋतुराज बीडकर 3, रोहित बीएस 2, पार्थ अंबुलकर 2, रोहित कुटे 1 यांनी सुरेख खेळी केली. तर, भागेश कुटे 4, अंकित प्रसाद 3, वैभव कुटे 3, प्रणव म्हात्रे 2 यांच्या विजयी खेळीच्या जोरावर इंडियन नेव्ही(भारतीय नौदल) संघाने रिलायन्स रायगड संघाचा 16-5 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात इंडियन नेव्ही(भारतीय नौदल) संघाने त्रिवेंद्रम इलेव्हन संघाचा 9-6 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला.
अन्य चुरशीच्या लढतीत डेक्कन जिमखाना संघाने इंडियन एअरफोर्स(भारतीय वायुसेना) संघाचा पेनल्टी शूट आउटमध्ये 13-12 असा संघर्षपूर्ण पराभव केला. निर्धारित वेळेत 9-9 असा सामना बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूट आऊटचा अवलंब करण्यात आला. पेनल्टी शूटमध्ये डेक्कन जिमखाना संघाने इंडियन एअरफोर्स(भारतीय वायुसेना) संघाचा 4-3 असा पराभव केला.
स्पर्धेचे उद्घाटन कॅट कंट्रोलचे हेमंत कटककर, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव मिहिर केळकर आणि विश्वेश कटककर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे चीफ ट्रस्टी जय आपटे, स्पर्धा संचालक शौर्य करंदीकर, नीता तळवळीकर, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू संजय करंदीकर, शैलेश ताम्हणकर, चंदू दाते, कुणाल वणकुद्रे, आशिष सांडू, मयंक पटेल, संकेत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल २०२६ स्पर्धेस १ मार्चपासून सुरुवात
पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचे आव्हान संपुष्टात
पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या मानस धामणेची विजयी आगेकूच