पुणे, 29 जानेवारी 2025: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) यांनी प्रायोजित केलेल्या व आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली 24व्या एनइसीसी डेक्कन जिमखाना आयटीएफ 75,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये दुसऱ्या फेरीत एकेरीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती, सहजा यमलापल्ली यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत दुसऱ्या फेरीत तिसऱ्या मानांकित हंगेरीच्या पन्ना उदवर्दी हिने भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या श्रीवल्ली श्मिका भामिदीप्तीचा टायब्रेकमध्ये 7-6(2), 6-2 असा पराभव केला. हा सामना 1 तास 53 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये सुरेख सुरुवात करणाऱ्या श्रीवल्लीने पन्नाची पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत 2-1 अशी आघाडी घेतली. पण चौथ्या गेममध्ये पन्नाने पुनरागमन करत श्रीवल्लीची सर्व्हिस ब्रेक केली व बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला. त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये पन्नाने वरचढ खेळ करत श्रीवल्लीविरुद्ध हा सेट 7-6(2) असा जिंकून आघाडी मिळवली. दुसरी सेटमध्ये पन्नाने आपले वर्चस्व कायम राखत श्रीवल्लीविरुद्ध हा सेट 6-2 असा सहज जिंकून विजय मिळवला. अव्वल मानांकित फ्रांसच्या लिओलिया जीनजीन हिने भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या सहजा यमलापल्लीचा 6-4, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली.
रशियाच्या इरिना श्यामानोविच हिने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या इटलीच्या कॅमिला रोसाटेल्लोचा 6-4, 0-6, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. रशियाच्या तातियाना प्रोझोरोव्हाने आठव्या
मानांकित अमेरिकेच्या एमिना बक्तासचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. चौथ्या मानांकित लिकटेंस्टाईनच्या कॅथीन्का वॉन डीचमनने क्वालिफायर चीनच्या फॅंग्रेन टीयानचा 6-3, 6-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या ऋतुजा भोसले हिने ग्रेट ब्रिटनच्या ॲलिसिया बार्नेटच्या साथीत ग्रेट ब्रिटनच्या युरिको लिली मियाझाकी व लिकटेंस्टाईनच्या कॅथीन्का वॉन डीचमनचा 6-2, 6-3 असा पराभव करून आगेकूच कायम राखली.
निकाल: एकेरी: मुख्य ड्रॉ: दुसरी फेरी:
लिओलिया जीनजीन (फ्रांस) [1]वि.वि. सहजा यमलापल्ली(भारत) 6-4, 6-3;
पन्ना उदवर्दी[3](हंगेरी)वि.वि. श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती (भारत)
7-6(2), 6-2;
कॅथीन्का वॉन डीचमन[4](लिकटेंस्टाईन)वि.वि.फॅंग्रेन टीयान (चीन)6-3, 6-2;
लॉरा पिगोस्सी [5](ब्राझील)वि.वि. टीना नादिन स्मिथ (ऑस्ट्रेलिया) 6-2,
6-7(4), 6-4;
युरिको लिली मियाझाकी (ग्रेट ब्रिटन) [6]वि.वि.एनास्तेसिया
तिखोनोव्हा(रशिया) 2-6, 7-6(7), 7-6(0);
इरिना श्यामानोविच वि.वि. कॅमिला रोसाटेल्लो (इटली) 6-4, 0-6, 6-4;
एलिना प्रिदांकिना[7](रशिया)वि.वि. लीना ग्लुश्को (इस्त्राईल)6-4, 6-4;
तातियाना प्रोझोरोव्हा(रशिया) वि.वि. एमिना बक्तास (अमेरिका) [8] 6-2, 6-3;
दुहेरी: उपांत्यपूर्व फेरी:
इडेन सिल्वा (ग्रेट ब्रिटन) /एनास्तेसिया तिखोनोव्हा [1]वि.वि. लीना
ग्लुश्को (इस्त्राईल) /अलेक्झांड्रा क्रुनिक (सर्बिया) 3-6, 6-2 [10-8]
अलेव्हटीना इब्रागिमोवा /एलेना प्रिडांकिना [4]वि.वि.डायना
मार्सिन्केविका(लात्विया) /नाहो सातो (जपान) 6-1, 6-2;
ॲलिसिया बार्नेट(ग्रेट ब्रिटन) /ऋतुजा भोसले (भारत) वि.वि. युरिको लिली
मियाझाकी(ग्रेट ब्रिटन) /कॅथीन्का वॉन डीचमन(लिकटेंस्टाईन)6-2, 6-3;
मारिया कोझीरेवा [2] /इरिना श्यामानोविच वि.वि.ॲलिस रॉब्बी(फ्रांस) /टीना
नादिन स्मिथ (ऑस्ट्रेलिया) 3-6 6-3 [10-7]
More Stories
पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना मैत्रीपूर्ण बॅडमिंटन लीग स्पर्धेत कटक्कर ईगल्स संघाला विजेतेपद
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला