पुणे, ४ जानेवारी २०२५ : राज्यात मराठी भाषेवरून आत्ता वाद पेटलेल पाहायला मिळत आहे.दोन दिवसांपूर्वी ठाण्यात मराठी भाषेवरून झालेल्या वादाच्या नंतर आता पुण्यात देखील हिंदी-मराठी वाद पेटला आहे. एअरटेलच्या कर्मचार्यांना फ्लोअर वर हिंदीच बोलायचं, मराठी बोलले तर कामावरून काढून टाकेल अस म्हणणाऱ्या एअरटेल वाकडेवाडी येथील शाहबाज अहमद या टिम लीडरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला.
पुण्यातील वाकडेवाडी येथे मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल वाकडेवाडी येथील शाहबाज अहमद या टिम लीडरला मनसे स्टाईलने चोप दिलं आहे. एअरटेल च्या कर्मचारी वर्गाला फ्लोअर वर हिंदीच बोलायचं मराठीमध्ये जर बोलले तर कामावरून काढून टाकेल तसेच हिंदू सणांना सुट्टी न देणे आणि गेले ३ महिने मराठी कर्मचार्यांचा पगार केला नाही अशा तक्रारी येथील कामगारांनी मनसे कडे केली. त्यामुळे मनसे स्टाईलने याला उत्तर देण्यात आले. येत्या सोमवारी पोरांचे पगार करायला लावले आहेत अन्यथा एकाच वेळी एकाच दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील ३ एअरटेल ऑफिस फोडून टाकणार असा अंतिम इशारा मनसेचे राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेचा वाद हा ठिकठिकाणी होताना पाहायला मिळत आहे.काही दिवसांपूर्वी ठाण्यात एका अधिकाऱ्यांकडून एका मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली त्यानंतर दोन दिवसापूर्वी मुंब्रा येथे मराठी युवकाला माफी मागायला लावली आणि आत्ता पुण्यात चक्क मराठी कामगारांना हिंदी मध्येच बोला अशी सक्ती करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी