पुणे, ३१ डिसेंबर २०२४ ः शिक्षिकेकडुन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर महापालिका प्रशासनाने शिक्षक पुरविणाऱ्या संस्थांना शाळांमधील शिक्षकांवर लक्ष ठेवण्यास, शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याच्या सुचना केल्या आहेत.
शाळेत दहावीत असणाऱ्या विद्यार्थ्यावर शिक्षिकेकडुनच लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. या घटनेनंतर शिक्षिकेस पोलिसांनी अटक केली होती. तर संस्थेनेही संबंधित शिक्षिकेचे तत्काळ निलंबन केले. दरम्यान, महापालिकेच्या शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी नाते अधिक दृढ व्हावे, यादृष्टीने महापालिकेने शाळांना शिक्षक पुरविणाऱ्या संस्थेला सुचना दिल्या आहेत. त्यासंदर्भात राज्य सरकारचे परिपत्रक संबंधित संस्थेला पाठविले आहे. संस्थेने त्यांच्या शिक्षकांवर निगराणी ठेवावी, त्यांचे पर्यवेक्षण करावे. तसेच शिक्षकांसह विद्यार्थ्यांचेही वेळोवेळी समुपदेशन करण्यावर भर द्यावा, अशा सुचना दिल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही