October 14, 2025

पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना मैत्रीपूर्ण बॅडमिंटन लीग स्पर्धेत कटक्कर ईगल्स संघाला विजेतेपद

पुणे, 13 ऑक्टोबर 2025: पुना क्लब लिमिटेड व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना मैत्रीपूर्ण बॅडमिंटन लीग स्पर्धेत अंतिम फेरीत कटक्कर ईगल्स संघाने इनामदार स्मॅशर्स संघाचा 3-1 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पुना क्लब येथील बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत कटक्कर ईगल्स संघाने इनामदार स्मॅशर्स संघाचा 3-1 असा पराभव केला. सामन्यात खुल्या दुहेरी 1 लढतीत स्मॅशर्सच्या अक्षय गद्रे व रेवती श्रीखंडे यांनी ईगल्सच्या यश शहा व मधुर इंगहळीकर यांचा 21-15, 21-13 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. खुल्या दुहेरीत 2मध्ये ईगल्सच्या पराग चोपडा व देवेंद्र चितळे यांनी गिरीश खिंवसरा व भूषण भंडारी यांचा 21-13, 15-21, 15-10 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. खुल्या दुहेरीत 3मध्ये ईगल्सच्या देवेंद्र जोशीने आशय कश्यपच्या साथीत अश्विन जोशी व यश मेहेंदळे यांचा 18-21, 21-08, 15-11 असा तर, खुल्या दुहेरीत 4मध्ये ईगल्सच्या आनंद शहा व निहार आडकर यांनी मृगेंद्र बेहेरे व रवींद्र कान्हेरे यांचा 21-18, 21-07 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

3ऱ्या व 4थ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत केदार नाडगोंडे, सारा नवरे, युवल गुलाटी, नीरज दांडेकर, रोहित मेहेंदळे, किरण संघवी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर अमोल शटलर्स संघाने एएसआर स्ट्रायकर्स संघाचा 3-1 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पूना क्लबचे अध्यक्ष गौरव गढोक, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव मिहीर केळकर आणि पूना क्लब, डेक्कन जिमखाना समितीचे सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.

निकाल: अंतिम फेरी:
कटक्कर ईगल्स वि.वि.इनामदार स्मॅशर्स 3-1(खुला दुहेरी 1: यश शहा/मधुर इंगहळीकर पराभुत वि.अक्षय गद्रे/रेवती श्रीखंडे 15-21, 13-21; खुला दुहेरी 2: पराग चोपडा/देवेंद्र चितळे वि.वि.गिरीश खिंवसरा/ भूषण भंडारी 21-13, 15-21, 15-10; खुला दुहेरी 3: देवेंद्र जोशी/आशय कश्यप वि.वि.अश्विन जोशी/यश मेहेंदळे 18-21, 21-08, 15-11; खुला दुहेरी 4: आनंद शहा/निहार आडकर वि.वि.मृगेंद्र बेहेरे /रवींद्र कान्हेरे 21-18, 21-07);

3ऱ्या व 4थ्या स्थानासाठी लढत:
अमोल शटलर्स वि.वि.एएसआर स्ट्रायकर्स 3-1 (खुला दुहेरी 1: केदार नाडगोंडे/सारा नवरे वि.वि.मृणाल शहा /पंकज शहा 21-19, 21-12; खुला दुहेरी 2: युवल गुलाटी/नीरज दांडेकर वि.वि.अमित परमार/विकास सुद 21-17, 21-07; खुला दुहेरी 3: रोहित मेहेंदळे/किरण संघवी वि.वि.चैत्राली नवरे/अमित दरेकर 21-13, 21-17; खुला दुहेरी 4: ब्रिन्दा थॉमस/प्रांजली नाडगोंडे पराभुत वि.सुहास गुरव/आरएस बेदी 15-21, 07-21).

इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू – वरद चितळे
सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू केदार नाडगोंडे
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू – रेवती श्रीखंडे
सर्वोत्कृष्ट प्रौढ खेळाडू – पंकज शहा
सर्वोत्कृष्ट खेळाडू – अक्षय गद्रे
12 वर्षाखालील सर्वोत्कृष्ट खेळाडू – राणा गोखले.