January 3, 2026

प्रभाग २५ मध्ये कुणाल टिळकांचा थेट ‘ग्रासरूट’ अटॅक

पुणे, ३१ जानेवारी २०२५: उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर कुणाल टिळक यांनी शुक्रवार पेठ परिसराला भेट देत प्रभाग क्रमांक २५ अंतर्गत निवडक बूथ प्रमुख व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेटी घेतल्या.

या भेटीदरम्यान बूथस्तरावरील सद्यस्थिती, स्थानिक नागरिकांचे प्रश्न तसेच आगामी निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या संघटनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कुणाल टिळक यांनी प्रत्येकाशी थेट संवाद साधत पक्षाची भूमिका, आतापर्यंत झालेली विकासकामे आणि पुढील नियोजनाची दिशा ठामपणे मांडली.

या प्रत्यक्ष भेटींमधून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा आणि प्रत्येक कार्यकर्त्याशी थेट संपर्क ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रभागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध, समन्वयात्मक आणि सकारात्मक पद्धतीने काम करण्याचा ठोस संकल्प यावेळी करण्यात आला.