पुणे, १४ एप्रिल २०२३: रमणबाग माजी विद्यार्थी फुटबॉल संघ यांच्या वतीने व पीडीएफएच्या मान्यतेखाली होत असलेल्या स्वर्गीय धनंजय भिडे सेव्हन-अ-साईड फुटबॉल चषक स्पर्धेत १६ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा शनिवार पेठ येथील न्यू इंग्लिश स्कुल रमणबाग मैदानावर १५ व १६ एप्रिल २०२३ रोजी होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना महेश पोंक्षे आणि नितीन भुतकर अभिजीत मेहेंदळे यांनी सांगितले की, स्वर्गीय धनंजय भिडे सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत डेक्कन इलेव्हन, इंद्रायणी एफसी, परशुरामीयन्स, चेतक एफसी, टायगर्स कम्बाईन, गनर्स, स्काय हॉक्स, रिअल पुणे युनायटेड, एनवायएफए, एनडीए, राहुल स्पोर्ट्स क्लब, मॅथ्यू अकादमी, नाझ इलेव्हन, फ्रेंड्स इलेव्हन, बेटा, एफसीपीसी हे १६ संघ झुंजणार आहेत. तसेच, हि स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व १०००० रुपये, उपविजेत्या संघाला ७००० रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत, याशिवाय बेस्ट स्ट्रायकर्स, बेस्ट गोलरक्षक, बेस्ट मध्यरक्षक यांना प्रत्येकी १०००रुपये आणि करंडक प्रदान करण्यात येणार आहे. शिस्तबद्ध संघाला करंडक देण्यात येणार आहे.
More Stories
भाषिक कौशल्यातून रोजगाराच्या अनेक संधी: प्रो. पराग काळकर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हिंदी दिवस सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रम संपन्न
केंद्र सरकारच्या सहकारी संस्थांबाबतच्या नवीन कायद्याची माहिती घेऊन विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्यवसाय उभे करावेत – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील