पुणे, 23फेब्रूवारी 2023: सेंट व्हिन्सेंट हायस्कूल पुणे कॅम्प यांच्या वतीने आयोजित सेंट व्हिन्सेंट ज्युनिअर फुटबॉल लीग 2023 स्पर्धेत साखळी फेरीत यजमान सेंट व्हिन्सेंट स्कूल व लॉयला स्कुल या संघांनी आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत स्पर्धेत आगेकूच केली.
सेंट व्हिन्सेंट हायस्कूल पुणे कॅम्प येथील मैदानावर दर आठवड्याच्या शनिवारी होत असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रणव मोटवानी व जोना अंबट यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलाच्या जोरावर सेंट व्हिन्सेंट स्कूल संघाने विद्याभवन संघाचा एकतर्फी लढतीत 2-0 असा तर प्रणय संचेती (11,17 मि.) याने केलेल्या हॅट्रिक कामगिरीच्या जोरावर लॉयला स्कुल संघाने कल्याणी हायस्कूल संघाचा 2-1 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
अन्य लढतीत युवान लोहिया व रियान कोगेकर यांच्या प्रत्येकी एका गोलासह विद्या व्हॅली संघाने ह्यूम मॅक हेन्री संघाचा 2-0 असा सहज पराभव केला. हचिंग्ज स्कूल संघाने ऑर्बिस स्कूल संघाचा 2-0 असा पराभव केला. विजयी संघाकडून शौर्य परदेशीने 5 व 21 मिनिटाला दोन गोल करत संघाला विजय मिळवून दिला.
लॉयला संघाने ह्यूम मॅट हेन्री संघाचा एकतर्फी लढतीत 2-0 असा सहज पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
सेंट व्हिन्सेंट स्कूल: 2 (प्रणव मोटवानी 4 मि., जोना अंबट 15 मि.)वि.वि.विद्याभवन: 0;
लॉयला स्कुल: 2 (प्रणय संचेती 11,17 मि.)वि.वि. कल्याणी हायस्कूल: 1 (आलाप चक्रवर्ती 7 मिनिटे);
हचिंग्ज: 0 बरोबरी वि.आर्यन्स वर्ल्ड स्कूल: 0;
विद्या व्हॅली: 2 (युवान लोहिया 3 मि., रियान कोगेकर 15 मि.) वि.वि.ह्यूम मॅक हेन्री: 0;
लॉयला स्कुल: 2 (प्रणय संचेती 6 मि., अनुराग पारसनीस 20 मि.) वि.वि. श्री श्री रविशंकर: 1 (रुतम महाजन 11 मि.);
कल्याणी शाळा: 1 (आलाप चक्रवर्ती 4 मि.) वि.वि.ह्यूम मॅक हेन्री: 0;
सेंट व्हिन्सेंट स्कूल: 1 (जोना अंबट 5 मि.) वि.वि. विद्या व्हॅली: 0;
हचिंग्ज स्कूल: 2 (शौर्य परदेशी 5, 21 मि.) वि.वि.ऑर्बिस स्कूल: 0;
लॉयला: 2 (अनुराग पारसनिस 5 मि., झिऑन हॅरी 16 मि.)वि.वि.ह्यूम मॅकहेन्री: 0.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.