पुणे,17 फेब्रुवारी 2026 : द पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन (पीबीएमए) आणि ब्लाईंड क्रिकेट असोसिएशन (बीसीए) तर्फे एचसीएलफाऊंडेशन च्या सहकाऱ्याने आयोजित राष्ट्रीय टी20 क्रिकेट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड स्पर्धेत गट साखळी फेरीत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल या संघांनी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
डेक्कन जिमखाना मैदान व पद्ममावती येथील टेंबेकर मैदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत ब गटात अनिल गरिया(138धावा व 5-13) याने केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर गुजरात संघाने राजस्थान संघाचा 338 धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने 19 षटकात 2बाद 368धावाचे आव्हान उभे केले. यात अनिल गरियाने 40चेंडूत 30चौकाराच्या मदतीने 138 धावांची शतकी खेळी केली. त्याला गणेश भुसाराने 78धावा, गणेशभाई गणवितने 64धावा, माजी भारतने 54 धावा काढून साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाचा डाव 5.3षटकात सर्वबाद 30धावावर संपुष्टात आला. विशेष म्हणजे गुजरातच्या अनिल गरियाने पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक कामगिरी केली. अनिलने 13धावांत 5 गडी बाद करून राजस्थानचा खुर्दा उडवला. त्याला माजी भारतने 13 धावांत 2 गडी बाद साथ देत संघाला 338 धावांनी विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात राहुल सोरेन(नाबाद 100 धावा व 2-9) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पश्चिम बंगाल संघाने चंदीगढ संघाचा 152 धावांनी पराभव केला.
अ गटात अभिजीत शिरोड(नाबाद 156 धावा व 2-15) याने केलेल्या सुरेख खेळीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेश संघाचा 176 धावांनी पराभव करत दुसरा विजय मिळवला. अन्य लढतीत योगेश जे(121धावा व 2-13) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर कर्नाटक संघाने मध्यप्रदेश संघाचा 112 धावांनी पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली.
निकाल: गट साखळी फेरी:
ब गट : डेक्कन जिमखाना मैदान :
पश्चिम बंगाल: 17 षटकात 4बाद 257धावा(राहुल सोरेन नाबाद 100(54, 12×4), सुभाष हलदार 79(37,10×4), चंदन मैती नाबाद 10, ऋषभ 2-34) वि.वि.चंदीगढ: 16.1 षटकात सर्वबाद 105धावा(मनीष शुक्ला 33, सनी चौहान 13, सुमंत पोद्दार नाबाद 16, राहुल सोरेन 2-9, जयदेव महाता 2-10); सामनावीर – राहुल सोरेन; पश्चिम बंगाल 152 धावांनी विजयी;
गुजरात: 19 षटकात 2बाद 368धावा(अनिल गरिया 138(40,30×4), गणेश भुसारा 78(31,13×4), गणेशभाई गणवित 64(26,12×4), माजी भारत 54(18, 7×4,3×6), अमित टेलर 1-74) वि.वि.राजस्थान: 5.3षटकात सर्वबाद 30धावा(लोकेश कुमार 8, विजय बाटी 5, अनिल गरिया 5-13, माजी भारत 2-13);सामनावीर – अनिल गरिया; गुजरात 338 धावांनी विजयी;
अ गट : टेंभेकर मैदान, पद्मावती
महाराष्ट्र: 20 षटकात 2 बाद 343धावा(अभिजीत शिरोड नाबाद 156(65,30×4), कृष्णा सोनवणे नाबाद 111(57,18×4)) वि.वि.उत्तर प्रदेश: 20 षटकात 7बाद 167धावा(अभिनव यादव नाबाद 44(34×4), ओमराज 44(34×4) 10, अभिजीत शिरोड 2-15); सामनावीर – अभिजीत शिरोड; महाराष्ट्र संघ 176 धावांनी विजयी;
कर्नाटक: 18 षटकात 4बाद 250धावा(योगेश जे 121(55,23×4,1×6), रंगा बी 60(29,13×4), मनोज एम नाबाद 32(23,4×4), सोनू गुप्ता 3-36) वि.वि.मध्यप्रदेश: 18षटकात 6बाद 156धावा(मुकेश राठोड 29, सतीश कानडे 28, श्याम बहादूर 28, मनोज एम 2-3, योगेश जे 2-13); सामनावीर – योगेश जे; कर्नाटक संघ 112 धावांनी विजयी.

More Stories
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल २०२६ स्पर्धेस १ मार्चपासून सुरुवात
पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचे आव्हान संपुष्टात
पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या मानस धामणेची विजयी आगेकूच