पुणे: 9 मार्च 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन तर्फे 2022 वर्षातील कामगिरीबद्दल खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संघांना पुणे येथे आयोजित एमएसएलटीए च्या वार्षिक दिन सोहळ्यात 17.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या शिष्यवृत्ती आणि बक्षिसे देऊन सन्मानित केले.
पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय टेनिसपटू अर्जुन कढे, ऋतुजा भोसले, वैष्णवी आडकर, अस्मी आडकर, मानस धामणे, अर्णव पापरकर आणि ऐश्वर्या जाधव यांच्यासह पार्थसारथी मुंढे, दक्ष पाटील, अधिराज दुधाणे आणि तमन्ना नायर या आपापल्या वयोगटात एमएसएलटीए वार्षिक मानांकन यादीत अग्रमानांकन पटकवेल्या खेळाडूंचा समावेश आहे.
एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, उपाध्यक्ष राजीव देशपांडे, मानद सचिव सुंदर अय्यर, कोषाध्यक्ष सुधीर भिवापूरकर, संयुक्त सचिव राजीव देसाई आणि शीतल भोसले यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
2022 मध्ये राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत विजेते आणि उपविजेते पटकवलेल्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात चेन्नई येथे झालेल्या 18 वर्षाखालील गटीत राष्ट्रीय स्पर्धेत एकेरी व दुहेरी गटात विजेतेपद व दिल्ली येथे दुहेरीचे उपविजेतेपद पटकावलेली मधुरिमा सावंत, दिल्ली येथे झालेल्या 14 वर्षाखालील दुहेरी मिनी ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा विजेती समर्थ सहिता, चेन्नई येथील 18 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेतील एकेरी विजेती आणि दुहेरी उपविजेती वैष्णवी आडकर, कोल्हापुर येथील 16 वर्षाखालील एकेरी विजेती व चेन्नई येथील दुहेरी उपविजेती अस्मी आडकर, दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय मिनी ज्युनियर स्पर्धेतील एकरी उपविजेती व , कोल्हापुर येथील 16 वर्षाखालील दुहेरी विजेती ऐश्वर्या जाधव, दिल्ली येथे झालेल्या 14 वर्षाखालील दुहेरी मिनी ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेतील एकेरी उपविजेता व दुहेरी विजेता अर्णव पापरकर, चेन्नई येथे झालेल्या 18 वर्षाखालील गटीत राष्ट्रीय स्पर्धेतील दुहेरी विजेती व दिल्ली चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील उपविजेती रूमा गाईकैवारी, कोल्हापुर येथील 16 वर्षाखालील दुहेरी विजेती आकृती सोनकुसरे, औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय मिनी ज्युनियर स्पर्धेतील दुहेरी विजेता वेदांत भसीन, दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय महिला स्पर्धेतील दुहेरी उपविजेती आकांक्षा नित्तुरे आणि एआयटीए रँकिंगमधील अव्वल 5 खेळाडूंना प्रशिक्षणासाठी 7 लाखांहून अधिक किमतीच्या एमएसएलटीए शिष्यवृत्तीने पुरस्कृत करण्यात आले.
पुण्याच्या नंदन बाळ, हेमंत बेंद्रे, केदार शहा व प्रसोनजीत पॉल, सालापूरच्या महेश शिंदे, कोल्हापूरच्या अर्षद देसाई यांना महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय खेळाडू निर्माण केल्या बद्दल विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. अधिकार्यांमध्ये गोल्ड बॅज ऑफिशीअल शीतल अय्यर यांना डब्ल्यूटीए सुपरवायझर म्हणून नामांकन मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. रिया चाफेकर यांना व्हिएतनामच्या टाय निन्ह येथे आयोजित आयटीएफ लेव्हल 2 स्कूलमध्ये आयटीएफ व्हाइट बॅज चेअर अंपायर झाल्याबद्दल,नेदरलँड्सच्या अॅमस्टेलवीन येथे आयोजित आयटीएफ लेव्हल 2 स्कूलमध्ये आयटीएफ व्हाइट बॅज रेफरी बनल्याबद्दल सेजल केनिया तर तेजल कुलकर्णीची एमएसएलटीए 2022 ची सर्वोत्कृष्ट टेनिस अधिकारी म्हणून सन्मान करण्यात आला.
हरयाणा येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेती पदक विजेत्या आकांशा नित्तुरे, वैष्णवी आडकर, सुदिप्ता कुमार, वैष्णवी आडकर, रुमा गायकवाडी यांना तसेच,
गुजरात येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक पदक विजेत्या पुरुष आणि महिला टेनिस संघात समावेश असेल्या अर्जुन कढे, अन्वित बेंद्रे, मानस धामणे, संदेश कुरळे, अथर्व शर्मा, कॅप्टन- शितल भोसले, प्रशिक्षक- नवदिप सिंग, ऋतुजा भोसले, आकांक्षा नित्तुरे, वैष्णवी आडकर, रुमा गायकैवारी. ईश्वरी मातेरे, कॅप्टन- हिमांशू गोसावी(10,000), प्रशिक्षक- नंदन बाळ(10,000) आणि फिजीओ अपुर्वा कुलकर्णी यांचा एमएसएलटीए कडून 5 लाख रूपये देऊन सन्मान करण्यात आला.
14 वर्षांखालील गटात भारतामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पुण्याच्या अर्णव पापरकरला महाराष्ट्र राज्यातील सर्वात उत्कृष्ट ज्युनियर खेळाडूसाठी माधव अॅनिगेरी स्मृती शिष्यवृत्ती, तर महाराष्ट्र मानांकित महिला खेळाडूंसाठी ऋतुजा भोसले आणि आकांशा निटुरे यांना श्रीमती नलिनी हत्तीकुदूर शिष्यवृत्ती तसेच महाराष्ट्र मानांकित पुरुष खेळाडूंसाठी पुण्याच्या अर्जुन कढे व कोल्हापूरच्या संदेश कुरळे यांना उल्का नाटेकर शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
2022 मध्ये महाराष्ट्रातील अव्वल खेळाडूंमध्ये सर्वाधीत नऊ खेळाडू असल्याचा बहुमान पुणे विभागाने पटकावला. 2022 मध्ये एमएसएलटीएने तब्बल 65 स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. यामध्ये. 12 अंतरराष्ट्रीय(टाटा महाराष्ट्र ओपन एटीपी 250, 3 महिला आयटीएफ, 1 पुरूष आयटीएफ, 2 आयटीएफ ज्युनीअर आणि 5 आयटीएफ सिनीअर), 36 एआयटीए मानांकन, 17 10वर्षाखालील राज्य मानांकन स्पर्धांचे आयोजन जिल्हा व झोनल यांच्या सहयोगाने करण्यात आले. पुणे विभागामध्ये देशातील सर्वाधिक 7 आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह 30 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विभागाने 2 आंतरराष्ट्रीय स्पर्धा, 6 एआयटीए मानांकन आणि 5 राज्य मानांकन स्पर्धांसह 13 स्पर्धांचे आयोजन केले. कोल्हापूर विभागात 7, औरंगाबाद विभागात 1 आयटीएफ सिनीअस सह 6, नवी मुंबई विभागात 1 आंतरराष्ट्रीय, सोलापूर व नागपूर विभागात 2 व नाशिक विभागात 1 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
More Stories
राज्यात काही ठिकाणी ३१ ऑक्टोबर तर काही ठिकाणी १ नोव्हेंबर रोजी साजरे करता येणार लक्ष्मीपूजन
निवडणूक निरीक्षक उमेश कुमार यांनी घेतला हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या कामकाजाचा आढावा
दिव्यांग मतदारांना उर्त्स्फूतपणे मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन