पुणे, २८ जून २०२५ : धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आयोजित मोहल्ला कमिटीच्या बैठकीत नागरिकांच्या समस्या ऐकताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि शिंदे गटाचे विभागप्रमुख उद्धव कांबळे यांच्यात वाद झाला. बैठकीत पायाभूत सुविधा, कचरा व्यवस्थापन, अनधिकृत बांधकाम या विषयांवर चर्चा सुरू होती.
दरम्यान, पद्मावती परिसरातील एका सोसायटीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी झोपडपट्टी शेजारी सुरू असलेल्या अवैध धंद्यांविषयी आवाज उठवला. या प्रश्नावर शिंदे गटाचे कांबळे यांनी हस्तक्षेप केला असता सुभाष जगताप यांनी त्यांना बोलण्यास मज्जाव केला.
यानंतर कांबळे यांना बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी “ही जागा आधी जगताप यांचीच होती” असा उल्लेख केला, ज्यामुळे वातावरण चिघळले आणि दोन्ही नेत्यांमध्ये वादाचे रूप घेतले.
राजकीय कुरघोडीने नागरिकांच्या चर्चेवर पाणी फेरल्याचे अनेकांनी उपस्थित ठिकाणी व्यक्त केले. यामुळे मोहल्ला कमिटी बैठक चर्चेपेक्षा राजकीय वादाचा मंच ठरल्याचे चित्र दिसले.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही