पुणे, 01/03/2023: कात्रज भागात लूटमारीस विरोध करणाऱ्या पादचारी तरुणाला बांबूने बेदम मारहाण करुन त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव नागनाथ चेंडके (वय २३, रा. खोपडेनगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रदीप हिरालाल शिंदे (वय १९, रा. काका वस्ती, कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे. शिंदे याचा चौदा वर्षीय अल्पवयीन साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चेंडके मजुरी करतो. तो धनकवडीतील चैतन्यनगर परिसरातून निघाला होता. रात्री साडेआठच्या सुमारास त्याला आरोपी शिंदे आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराने चेंडकेला अडवले. त्याला धमकावून पैसे मागितले. चेंडकेने नकार दिल्यानंतर दोघांनी त्याला बांबूने बेदम मारहाण केली.
गंभीर जखमी झालेल्या चेंडकेचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी प्रदीप शिंदे याला अटक करण्यात आली. शिंदे याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक तावडे तपास करत आहेत.
More Stories
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान
हडपसर मध्ये प्रशांत जगताप यांना मुस्लिम समाजाचे आव्हान, शरद पवारांकडे महत्वाची मागणी