April 22, 2024

कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी काेल्हापूरमधील एकाला अटक

पुणे , दि. ११/०७/२०२३: कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कोल्हापूरमधील तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेत अटक केली आहे.

प्रशांत पाटील (मूळ रा. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

भुजबळ यांच्या कार्यालयात संपर्क साधून त्याने जीवे मारण्याची सुपारी मिळाली असल्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. भुजबळ सोमवारी (१० जुलै ) पुण्यात आले होते. धमकीचा दूरध्वनी आल्यानंतर पुणे पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने तातडीने तपास सुरु केला. भुजबळ यांच्या कार्यालयात धमकीचा दुरध्वनी करणारा महाड परिसरात असल्याची माहिती तांत्रिक तपासात मिळाली. त्यानंतर खंडणी विरोधी पथक महाडला रवाना झाले. पोलिसांच्या पथकाने पाटील याला महाड परिसरातून ताब्यात घेतले.पोलिसांचे पथक पाटील याला घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहे. पाटीलने दारुच्या नशेत भुजबळ यांच्या कार्यालयात संपर्क साधून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.